विरार : ठाणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई विनोद पारधी यांची अज्ञात इसमाने हत्या करून त्यांचा मृतदेह वसई येथील पाचू बंदर खाडीकिनारी टाकल्याची घटना घडली आहे. याबाबत ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. राज्यात ठिकठिकाणी पोलिसांवर हल्ल्याच्या घटना घडत असताना पाचू बंदर येथे झालेल्या पोलीस शिपायाच्या हत्येमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
वसईत पोलीस शिपायाची हत्या
By admin | Updated: September 10, 2016 06:04 IST