शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

आंबेडकरवादी लेखक कृष्णा किरवलेंची हत्या

By admin | Updated: March 4, 2017 06:13 IST

कृष्णा रामभाऊ किरवले (वय ६३, रा. म्हाडा कॉलनीजवळ, राजेंद्रनगर, कोल्हापूर) यांची शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास राहत्या घरी गळा चिरून हत्या करण्यात आली

कोल्हापूर : आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक व शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. कृष्णा रामभाऊ किरवले (वय ६३, रा. म्हाडा कॉलनीजवळ, राजेंद्रनगर, कोल्हापूर) यांची शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास राहत्या घरी गळा चिरून हत्या करण्यात आली. फर्निचरच्या कामाचे २५ हजार रुपये वेळेत न दिल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी प्रीतम गणपती पाटील (३०) यास अटक केली आहे. त्याच्या आई-वडिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.किरवले यांच्या हत्येमुळे दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. हा खून दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी या मालिकेतील असून त्यामागे हिंदुत्ववाद्यांचे षड्यंत्र असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्या दिशेने पोलिसांनी तपास करावा, असा त्यांनी आग्रह धरला. त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना घेरावही घातला; परंतु हत्येचे कारण व संशयित आरोपीस अटक केल्याचे समजल्यावर हे कार्यकर्ते शांत झाले. आरोपीचा मित्र विजयसिंह मोहनसिंह राजपूत (३४) याच्या तक्रारीवरून राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. किरवले हे मूळचे बीड जिल्ह्यातील टाकळी आचार्य (ता. परळी वैजनाथ) गावचे होते. नोकरीनिमित्ताने ते येथे १६ वर्षांपूर्वी आले व या शहराच्या सामाजिक चळवळीचे महत्त्वाचे अंग बनून गेले. येथील निवासस्थानी ते पत्नी कल्पना यांच्यासमवेत राहत होते. त्या दुपारी घरीच होत्या. त्यावेळी संशयित प्रीतम पाटील हा पैसे मागण्यासाठी घरी आला. दुसऱ्या मजल्यावर त्याने किरवले यांच्याशी वाद घातला. त्यानंतर धारदार शस्त्राने किरवले यांच्या डोक्यात वार झाल्यावर ते जोराने ओरडले म्हणून त्यांची पत्नी वर गेल्यावर त्यांनी किरवले यांना रक्ताने माखलेल्या शरीरासह आरोपीने हाताने दाबून धरल्याचे पाहिले. ते पाहून भीतीने त्या ओरडतच बाहेर धावत आल्या. तोपर्यंत आरोपीने दरवाजा बंद करून घेतला. पत्नीने नातेवाइकांना हा प्रकार सांगितला. आजूबाजूचे लोक धावून गेले; परंतु तोपर्यंत किरवले यांच्या गळ््यावर वार केले होते. प्रीतम पाटीलने मित्र विजयसिंहला फोन करून आपण खून केल्याचे व लोक जमले आहेत तर तू लवकर ये, असे सांगितले. त्यानंतर तो पसार झाला. डॉ. किरवले यांच्यावर हल्ला झाल्यानंतरही ते जिवाच्या आकांताने पळत दुसऱ्या मजल्यावरून खाली आले. त्यामुळे जिना व घरही रक्ताने माखले होते. शेवटी रक्तस्राव जास्त झाल्यावर ते कोसळले व तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. >दलित चळवळीचे भाष्यकार...डॉ. किरवले यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झाले. तिथेच १९८० ला ते एम.ए. झाले. पुढे १९८७ ला त्यांनी ‘दलित शाहिर व त्यांची शाहिरी’ या विषयावर पीएच. डी. केली. पुण्यातील गरवारे वाणिज्य महाविद्यालयातून १९८७ पासून सहायक प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापनाचे काम सुरू केले. त्यानंतर पुणे विद्यापीठातही काम केले. पुढे २००२ ला ते शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागात रुजू झाले. मराठी विभागाचे प्रमुख तसेच विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.दलित आणि ग्रामीण शब्दकोश निर्मितीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला. दलित चळवळ आणि साहित्य, समग्र लेखक बाबूराव बागुल अशी त्यांची कांही पुस्तके प्रसिध्द आहेत. जळगांवला २०१२ ला झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी आंबेडकरी चळवळ, शाहिरी या विषयांवर दहा ग्रंथांचे लेखन केले आहे. या चळवळीचा भाष्यकार अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख होती. मित्राच्या मुलानेच केला घात..डॉ. किरवले यांचे व संशयित आरोपी प्रीतम याचे वडील गणपती पाटील यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. ते शेजारीच राहात होते. त्यामुळे ओळखीतून त्यांनी गणपती पाटलांकडून फर्निचरचे काम करुन घेतले होते. त्याचे पैसे द्या, असा तगादा प्रीतमने गेल्या काही दिवसांपासून तगादा लावला होता. पैसे देऊन टाका...खून झाल्यानंतर नातेवाइकांनी पत्नी कल्पना यांना शेजारच्या घरातून हाताला धरून आणले. त्यावेळी त्या ‘पैसे देऊन टाका... आपणाला हे घर नको. येथून दुसरीकडे राहायला जाऊ असे मी त्यांना सांगत होते; पण त्यांनी ऐकले नाही.’ असे मोठमोठ्याने म्हणत होत्या. त्यानंतर त्या दुसऱ्या मजल्यावर गेल्या. खाली कार्यकर्ते घोषणा देताना पाहून त्यांनीही खिडकीत येऊन ‘डॉ. आंबेडकर यांचा विजय असो..’ अशा घोषणा दिल्या.>साहित्यात मोठा वाटादलित आणि ग्रामीण शब्दकोश निर्मितीत डॉ. किरवले यांचा मोलाचा वाटा राहिला. दलित चळवळ आणि साहित्य, समग्र लेखक बाबूराव बागुल अशी त्यांची काही पुस्तके प्रसिद्ध आहेत.