शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्या अपहृत युगची हत्या

By admin | Updated: September 3, 2014 01:37 IST

दहा कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या क्रूरकर्मांनी अखेर चिमुकल्या युग मुकेश चांडक याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्याचा मृतदेह खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबुळखेडा गावाजवळच्या पुलाखालून

मृतदेह खापरखेड्याजवळ आढळला : दोन क्रूरकर्मा ताब्यात नागपूर : दहा कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या क्रूरकर्मांनी अखेर चिमुकल्या युग मुकेश चांडक याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्याचा मृतदेह खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबुळखेडा गावाजवळच्या पुलाखालून आज शहर पोलिसांनी ताब्यात घेतला. दरम्यान, अपहृत युगची अपहरणकर्त्यांनी हत्या केल्याच्या वृत्ताने उपराजधानीकरांना अक्षरश: हादरवून सोडले आहे. छापरूनगर चौकाजवळच्या गुरुवंदना अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या डॉ. मुकेश चांडक (वय ४०) यांना ध्रृव (वय ११) आणि युग (वय ८) अशी दोन मुले होती. हे दोघेही वाठोड्यातील सेंटर पॉर्इंट स्कूलमध्ये शिकत होते. सोमवारी दुपारी ४ वाजता सेंटर पॉर्इंट स्कूलच्या बसने युग घरी परतला. मात्र, तो घरात गेला नाही. बसमधून उतरताच अपार्टमेंटसमोर स्कुटीवर असलेल्या एका अपहरणकर्त्याने त्याला स्वत:सोबत चलण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे युग आपल्या सहनिवासाच्या प्रवेशद्वाराजवळ आला. त्याने तेथील चौकीदाराच्या खुर्चीवर शाळेचे दप्तर फेकले अन् धावतच रस्ता दुभाजकापलीकडे गेला. दरम्यान, दोन-अडीच तास होऊनही युग घरी न परतल्याने त्याच्या आईने चौकीदाराकडे विचारणा केली आणि त्यानंतर युगचे अपहरण झाल्याचे उघड झाले. डॉ. चांडक यांनी लगेच लकडगंज पोलिसांकडे तक्रार नोंदवली. हत्येची कबुलीयुग ज्या पध्दतीने स्कुटीस्वाराकडे गेला ते बघता अपहरणकर्ता त्याच्या ओळखीचा असावा, असा पोलिसांचा अंदाज होता. त्यात तो लाल रंगाचा टी शर्ट घालून असल्याचे कळल्यामुळे तो डॉ. चांडक यांच्या क्लिनिकशी संबंधित असावा, असाही पोलिसांचा कयास होता. पोलिसांनी आजी-माजी कर्मचाऱ्यांसह ४० ते ५० जणांना सोमवारी सायंकाळपासून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली. त्यातील अखेर एका संशयिताने (चांडक यांच्याकडील माजी कर्मचाऱ्याने) युगची हत्या केल्याची कबुली दिली.