शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरण: विशेष वकिलाची नियुक्ती 14 ऑक्टोबरपर्यंत नाही, राज्य सरकारचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 12:49 IST

यापूर्वी हा खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील धीरज मिरजकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

मुंबई : ख्वाजा युनूस कोठडी मृत्यू प्रकरणी १४ ऑक्टोबरपर्यंत विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करणार नाही, असे आश्वासन सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला बुधवारी दिले. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्यासह चार पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध ख्वाजा युनूस कोठडी मृत्यूप्रकरणी खटला सुरू आहे.

यापूर्वी हा खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील धीरज मिरजकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. २०१७ मध्ये त्यांच्याकडून अचानकपणे या खटल्याचे कामकाज काढून घेण्यात आले. सरकारच्या या निर्णयाला ख्वाजा युनूसची आई असिया बेगम यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणी न्या. पी. बी. वराळे व न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठापुढे होती.

असिया बेगम यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील मिहीर देसाई यांनी न्यायालयाला सांगितले की, जुलै २०१८ मध्ये सरकारने न्यायालयाला तोंडीच आश्वासन दिले होते की, या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत नवीन विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करणार नाही. तरीही मंगळवारी सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयाला सांगितले की, हा खटला चालवण्यासाठी ते अन्य एका वकिलाची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याच्या विचाराधीन आहेत. त्यावर न्यायालयाने सरकारी वकील संगीता शिंदे यांना याबाबत महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याकडून याबाबत सूचना घेण्यास सांगितले.

न्यायालयाने सरकारला बजावले‘आम्ही सरकारी वकिलांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देऊ, तोपर्यंत विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करू नका,’ असे न्यायालयाने सरकारला बजावले. याचिकेवरील पुढील सुनावणीपर्यंत हा खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अन्य वकिलाची नियुक्ती करणार नाही, अशी सूचना महाअधिवक्ता व विधि विभागाकडून घेतली असल्याची माहिती शिंदे यांनी खंडपीठाला दिली. सरकारच्या आश्वासनानंतर न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी १४ ऑक्टोबर रोजी ठेवली. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारCourtन्यायालयadvocateवकिल