शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

खोतकर-दानवे वाद औरंगाबादेतच मिटणार? 'मातोश्री'वरील बैठक निष्फळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 17:41 IST

जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर उत्सुक आहेत. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना मतदार संघातून लढण्यासाठी आग्रही आहे.

मुंबई : जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर उत्सुक आहेत. तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जालना मतदार संघातून लढण्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीमध्ये जालन्याच्या जागेवरून तिढा निर्माण झाला आहे.या जागेचा तिढा सोडविण्यासाठी आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धाव ठाकरे, महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात बैठक झाली. परंतु ही बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे यावर उद्या रविवारी औरंगाबादेत तोडगा निघण्याची शक्यता आहे.

मुंबईत आज उद्धव ठाकरे, खोतकर आणि पंकजा मुंडे यांच्यात बैठक झाली. या बैठकीतून काहीही निष्फळ झाले नाही. उद्या औरंगाबाद युतीचा संयुक्त मेळावा आहे. या मेळाव्याआधी यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यासाठी मेळाव्याआधी एका हॉटेलात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर यांच्यात औरंगाबाद येथे एक बैठक होणार आहे.

दरम्यान, याआधी अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भातील निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवला होती. त्यानंतर उद्धव यांनी अप्रत्यक्ष निर्णय देताना खोतकर यांना पंकजा मुंडे यांच्यासोबत मराठावाडा समन्वयकपदी नियुक्त केले होते. परंतु अर्जुन खोतकर यांनी निर्णय मान्य नसल्याचे सांगत, पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यातच त्यांनी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेतली होती. त्यावेळी सत्तार यांनी देखील खोतकर यांच्याकडून लवकरच गूड न्यूज मिळेल असे म्हटले होते. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. यामुळे आज मातोश्रीवर तातडीने बैठक घेण्यात आली होती. दरम्यान रविवारी होणाऱ्या बैठकीनंतरच अर्जुन खोतकर यांची भूमिका स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरRaosaheb Danweरावसाहेब दानवेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक