शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात!

By admin | Updated: July 6, 2015 03:51 IST

पावसाने दडी मारल्याने राज्यातील खरीप हंगाम धोक्यात आला असून, सुमारे ८० ते ९० लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत.

पुणे/अकोला/जळगाव : पावसाने दडी मारल्याने राज्यातील खरीप हंगाम धोक्यात आला असून, सुमारे ८० ते ९० लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. येत्या दोन-चार दिवसांत तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. मात्र तरीही पाऊस लांबून दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येईल, असे महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. शिवाय, गरज पडली तर कृत्रिम पाऊस पाडण्याची शासनाची तयारी असल्याचेही ते म्हणाले.यंदा पावसाने वेळेवर सुरुवात केली, पण त्यानंतर लगेच दडी मारली. राज्यातील १.४० कोटी हेक्टरवरील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देशात कापूस हे नगदी पीक जवळपास ४० लाख हेक्टर घेतले जाते; परंतु पाऊस नाही आणि तापमान प्रचंड वाढत असल्याने मराठवाडा, विदर्भातील कापूस पिकाने माना टाकणे सुरू केले आहे. विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातही तीच अवस्था आहे. चार दिवसांपूर्वी राज्यात ३४% म्हणजेच ४५.७३ लाख हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी केली होती. त्यामध्ये १०% वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील ९० लाख हेक्टर क्षेत्र अद्याप नापेर आहे.औरंगाबादमध्ये कृत्रिम पाऊसआॅगस्ट महिन्यातच पावसाने ओढ दिली तर कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी आहे. त्यासाठी जागतिकस्तरावर निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यात एका कंपनीची निविदा मंजूरही करण्यात आली आहे. औरंगाबाद केंद्रस्थानी ठेवून आवश्यकता भासल्यास २५० किमी परिघात कृत्रिम पाऊस पाडला जाईल. त्यासाठी रडार व इतर प्राथमिक यंत्रणेची जुळवणी सुरू आहे. तसेच रॉकेटच्या माध्यमातून पाऊस पाडण्याचा प्रस्ताव अन्य कंपनीने दिल्याचे खडसे यांनी सांगितले.पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पश्चिम महाराष्ट्रातील खरिपातील पिकांवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत आपत्कालीन नियोजन देणार आहोत. पावसाची सध्या नितांत गरज आहे, असे अहमदनगरमधील राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनी सांगितले.----------मराठवाड्यातील पिके आणखी पाच ते सहा दिवस तग धरतील. त्यानंतर मात्र या पिकांना धोका राहणार आहे. परभणी, उस्मानाबाद व लातूर या भागात पाऊस अत्यंत कमी आहे. त्यासाठी पावसाची नितांत गरज आहे. आपत्कालीन पीक नियोजन तयार केले आहे. - डॉ. बी. वेंकटेस्वोरलू,कुलगुरू, व्हीएनएमके व्ही, परभणी-----------पावसाने दडी मारल्याने पेरण्यांवर परिणाम झाला असून, खरीप पिकांना झळ बसण्याचा धोका आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांची रोवणीची कामे पावसाअभावी खोळंबली आहेत.- अनिल बन्सोड, पीक सांख्यिकी अधिकारी, कृषी आयुक्तालय, पुणे-----------तीन दिवसांचा ‘ओला’ अंदाजपुणे येथील वेधशाळेच्या अंदाजानुसार, पुढील ३ दिवसांत कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर गुरुवारी कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.