शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंच्या वक्तव्याने गुलाबराव पाटलांच्या दाव्याला बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 12:30 IST

एकनाथ खडसे यांच्यासह भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. किती नेते संपर्कात आहेत हे मात्र आज सांगू शकत नाही. असे विधान नुकतेच शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते.

मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी माझं तिकीट कापलं, असा खळबळजनक दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी केला असतानाच त्यांनी आता मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'मी शिवसेनेच्या संपर्कात होतो आणि सेनेचे नेतेही माझ्या संपर्कात होते हे खरं आहे', असं वक्तव्य भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

एकनाथ खडसे यांच्यासह भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. किती नेते संपर्कात आहेत हे मात्र आज सांगू शकत नाही. असे विधान नुकतेच शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा पाहायला मिळत होती. त्यांनतर आता या विषयी खुद्द एकनाथ खडसे यांनीच खुलासा केला आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना खडसे म्हणाले की, मी भाजप सोडू शकतो किंवा जाऊ शकतो असं म्हटलं नव्हतं, मी संन्यासही घेऊ शकतो. तर पक्षाने माझ्या मागणीची नोंद घेतली याचं समाधान आहे. मला न्याय मिळेपर्यंत मी संघर्ष करणार असल्याचे खडसे म्हणाले.

तर याचवेळी पुढे बोलताना, मी शिवसेनेच्या संपर्कात होतो आणि सेनेचे नेतेही माझ्या संपर्कात होते हे खरं आहे, असेही खडसे म्हणाले. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्यानंतर गुलाबराव पाटील यांच्या दाव्याला बळ मिळाला असल्याची चर्चा आहे.