शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

खडसे-पवार संघर्ष

By admin | Updated: March 31, 2015 02:56 IST

धनगर समाजाच्या आरक्षणावरून आज महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात विधानसभेत जोरदार खडाजं

मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणावरून आज महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. आघाडी सरकारच्या काळात आपल्या अध्यक्षतेखाली कुठलीही समिती नेमलेली नसताना खडसे यांनी खोटी माहिती देऊन आपली बदनामी केली, असा आक्षेप पवार यांनी नोंदविला. तर समिती नव्हे, बैठकीत विरोध करण्यात आला होता, असे खडसे यांनी खुलासा केला.२७ एप्रिल रोजी विधान परिषदेत निवेदन करताना महसूलमंत्री खडसे यांनी आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने धनगर जातीस अनुसूचित जमातीचे फायदे देण्यास विरोध करणारा अहवाल दिला होता, असा गौप्यस्फोट करून एकच खळबळ उडवून दिली होती. सोमवारी हा मुद्दा अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. ते म्हणाले, की आघाडी सरकारच्या काळात आपल्या अध्यक्षतेखाली धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कोणतीही समिती नियुक्ती करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्या समितीने कोणत्याही प्रकारचा अहवाल देण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र खडसे यांनी सभागृहात चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. त्यावर खडसे म्हणाले, की जर आपण समिती म्हणालो असू तर तो शब्द वापस घेऊ. पण अजित पवारांच्या दालनात झालेल्या बैठकीत आरक्षणाला विरोध करण्याचा निर्णय झाला होता. त्याचे मिनिट्स आपल्याकडे आहेत, असा दावा खडसे यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)