शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
3
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
4
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
5
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
6
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
8
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
9
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
10
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
11
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
12
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
13
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
14
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
15
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
16
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
17
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
18
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
19
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?

फडणवीस-ठाकरेंमध्ये खडाजंगी

By admin | Updated: October 31, 2015 02:42 IST

राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारची वर्षपूर्ती होत असतानाच कल्याण-डोंबिवली महापालिकेतील प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

ठाणे : राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारची वर्षपूर्ती होत असतानाच कल्याण-डोंबिवली महापालिकेतील प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परस्परांवर शेलक्या शब्दांत केलेल्या टीकेमुळे दोन्ही पक्षांतील (मैत्रीपूर्ण) संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. उद्धव यांनी सरकारला ‘हद्दपार’ करण्याची धमकी दिली, तर आमच्याही कार्यकर्त्यांनी बांगड्या भरलेल्या नाहीत, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले.महापालिका निवडणुकीची सांगता अनेक नाट्यपूर्ण घडामोडींनी झाली. एकनाथ शिंदे यांनी भर सभेत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा उद्धव यांच्याकडे देऊ केला. तो स्वीकारला गेला नाही, पण त्यामुळे उभय पक्षांतील कटुतेत भर पडली. कल्याण येथे सांगता सभेत बोलताना ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना वाघाच्या पंजाची आठवण करून देताना भाजपाचा माज उतरवण्याची भाषा केली. पोलिसांनी भाजपाची धुणी-भांडी करू नयेत. शिवसैनिकांना तडीपार कराल, तर आम्ही सरकारला तडीपार करू, असा इशाराही उद्धव यांनी दिला. तर कल्याण येथेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाघाच्या तोंडातील दात मोजण्याची आमची जात असल्याचे सांगत शिवसेनेचे पुरते वस्त्रहरण केले. निवडणुकीपुरते हिंदुत्वावर बोलून आम्हाला शिकवण्याच्या फंदात पडू नका, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले. (प्रतिनिधी)भाजपा कार्यकर्त्याचं अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न होतो. ही कोणाची संस्कृती आहे, असा सवाल करत शिवसेनेच्या या दहशतवादाविरुद्ध मी स्वत: निवडणूक आयोगाकडे तक्रार करेन, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.महापालिकांमधील गोल्डन गँग, बांधकाम क्षेत्रातील भ्रष्टाचार या मुद्द्यांवर आपल्या प्रचारात जोर दिला होता. ठाण्यातील सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील लोकप्रतिनिधींच्या सहभागाच्या पार्श्वभूमीवर प्रचारातील हे मुद्दे प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.आम्हाला कसला वाघाचा पंजा दाखवताय? वाघाच्या तोंडातील दात मोजण्याची आमची जात आहे.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री