शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

"अमली पदार्थांपासून तरुणाईला दूर ठेवा, सतर्कपणे काम करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 08:59 IST

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची पोलीस यंत्रणेला सूचना

नागपूर : अमली पदार्थाच्या विळख्यात सापडून तरुणाई उद्ध्वस्त होऊ शकते. हे ध्यानात घेऊन पोलिसांनी आता नक्षलवाद आणि दहशतवादाइतकेच गांभीर्याने अमली पदार्थाच्या तस्करीत लक्ष द्यावे, अशी सूचना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी पोलीस दलाला केली.येथील पोलीस निवासस्थानाचे नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री नितीन राऊत आदी उपस्थित होते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे उद्घाटनही त्यांनी केले.सध्या अमली पदार्थाचा विषय सर्वत्र चर्चेत आहे. त्याला स्पर्श करताना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी अमली पदार्थ आणि दुष्परिणामाचे सांकेतिक विश्लेषण केले. दहशतवाद आणि नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी पोलीस ज्या सतर्कतेने आणि आक्रमकपणे काम करतात तशाच प्रकारे आता अमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी पोलिसांना काम करावे लागेल. त्यासाठी शाळा महाविद्यालयाच्या अवती-भवतीही  नजर रोखावी लागेल, असे ते म्हणाले.पोलिसांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. पोलिसांचे संख्याबळ वाढवण्यासाठी १२ हजार पोलिसांच्या भरतीचे उद्दीष्ट सरकार समोर असल्याचे त्यांनी सांगितले.‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू’महिला अत्याचारासंबंधित शक्ती कायदा विधेयक नागपूर अधिवेशनात संमत करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. संयुक्त निवड समितीच्या अहवालावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे वळसे-पाटील म्हणाले....हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान- मुख्यमंत्री ठाकरेडीएनए विश्लेषण विभागाचे ऑनलाइन उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या महाराष्ट्रात अमली पदार्थ कारवाईचे पेव फुटले आहे, जणू काही संपूर्ण जगातील अमली पदार्थ केवळ महाराष्ट्रात आहेत, असे वातावरण निर्माण केले जात आहे आणि केंद्रातील तपास युनिटच ते शोधू शकते, असे दाखविले जात आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी २७ कोटी रुपयांचे हेरॉईन पकडले पण त्यात हिरोईनचा संबंध नसल्याने त्यांच्या कारवाईला प्रसिद्धी मिळाली नाही. महाराष्ट्र पोलिसांची ख्याती देशभर आहे. त्यामुळेच महाराष्ट्र व महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटील