शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
3
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
5
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
6
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
7
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
8
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
9
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
10
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
11
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
12
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
13
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
14
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
16
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
17
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
18
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
19
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
20
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं

पासपोर्ट तयार ठेवा, हल्ला करुन अफगाणमध्ये पळून जा

By admin | Updated: January 28, 2016 01:33 IST

पासपोर्ट तयार ठेवा. भारतात हल्ला करुन अफगाणिस्तानमध्ये पलायन करा आणि इसिसमध्ये सहभागी व्हा. हा सल्ला देण्यात आला होता त्या तरुणांना ज्यांना मागील आठवड्यात अटक करण्यात आली आहे.

- डिप्पी वांकाणी, मुंबईपासपोर्ट तयार ठेवा. भारतात हल्ला करुन अफगाणिस्तानमध्ये पलायन करा आणि इसिसमध्ये सहभागी व्हा. हा सल्ला देण्यात आला होता त्या तरुणांना ज्यांना मागील आठवड्यात अटक करण्यात आली आहे. लखनौमध्ये याबाबत एक बैठकही झाली होती, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. दक्षिण मुंबईतील जे.जे. रोड भागातील दोन हवाला आॅपरेटरर्सची ओळख पटली आहे. ज्यांनी या प्रकरणात आर्थिक व्यवहार केला आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली. मागील आठवड्यात ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील रिझवान उर्फ निवाजुद्दिन व मोहम्मद अलीम यांचा समावेश आहे. तर मुंबईच्या मुदब्बीर शेखवर तरुणांची भरती करण्याची जबाबदारी होती. तो लखनौला अलीमच्या घरीही जाउन आला होता अशी माहिती समोर येत आहे. नवीन भरती करतांना पासपोर्ट असलेल्या तरुणांचा शोध घ्यायचा असेही ठरविण्यात आले होते. जर या तिघांना काही तत्काळ काम सोपविलेले नसेल तर शफी अम्मार उर्फ यूसूफ हा त्यांना आॅनलाइन प्रशिक्षण देणार होता. आदेशाची प्रतीक्षा करा, असेही त्यांना सांगण्यात आले होते. इराक किंवा अफगाणिस्तानात त्यांना इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी पाठविण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जे.जे. रोड वरील दोन दुकान मालकांची चौकशी केली जात आहे. त्यांनी हवालाच्या माध्यमातून मुदब्बीरला पैसे दिल्याचा आरोप आहे. तरी, दुकान मालकांचा या सर्व प्रकरणात कितपत सहभाग आहे यावरच त्यांची अटक अवलंबून असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. मालवणी प्रकरणात एटीएसने रिझवानची (२१) कोठडी मिळविली आहे. त्याचे वडील उत्तरप्रदेशात सरकारी कर्मचारी आहेत. लखनौच्या एका महाविद्यालयात रिझवानचा १२ वीला प्रवेश करुन देण्यात आला होता. तो एकदा मालवणीतील चार तरुणांना भेटायला व दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात मालवणीतील तरुणांच्या भरतीबाबत मुंबईत आला होता. तो रडारवर नाही : रेहमान हा या प्रकरणात सहभागी नसल्याचे दिसून येत असल्यामुळे तो आता पोलिसांच्या रडारवर नाही. त्याच्याशी संबंधित माहिती घेतल्यानंतरच हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.