शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

प्रत्येक वीजनिर्मिती प्रकल्पांत २२ दिवसांचा कोळसा साठा ठेवा- हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 01:58 IST

महाजनको, वेकोलि, रेल्वेला ठरवायचेय धोरण

नागपूर : कधीही भारनियमन करण्याची वेळ येऊ नये याकरिता केंद्रीय वीज प्राधिकरणच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्यातील प्रत्येक औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये किमान २२ दिवस पुरेल एवढा कोळशाचा साठा ठेवण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी देऊन महाजनको, वेकोलि व रेल्वे प्रशासन यांना यासंदर्भात तीन आठवड्यांत धोरण तयार करण्यास सांगितले.आकस्मिक परिस्थितीत वापरण्याकरिता औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये किमान २२ दिवस पुरेल एवढा कोळशाचा साठा ठेवणे आवश्यक आहे. तसेच, रोज वापरण्याकरिता चालू साठा ठेवावा लागतो. यासंदर्भात केंद्रीय वीज प्राधिकरणने मार्गदर्शकतत्त्वे ठरवून दिली आहेत. परंतु, राज्यातील बहुतेक औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांत२२ दिवस पुरेल एवढा कोळशाचा साठा नाही. गेल्या २३ फेब्रुवारीपर्यंत महाजनकोच्या चंद्रपूर प्रकल्पात ४ लाख ७० हजार, पारसमध्ये ४१ हजार, परळीमध्ये १ लाख ३५ हजार, नाशिकमध्ये ६६ हजार, भुसावळमध्ये ७५ हजार, कोराडीमध्ये १ लाख ४२ हजार तर, खापरखेडामध्ये १ लाख ३८ हजार टन कोळशाचा साठा होता. अशा परिस्थितीत नैसर्गिक वा अन्य आपत्तीमुळे नियमित कोळसा पुरवठा बंद झाल्यास राज्याला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागू शकते. परिणामी, उच्च न्यायालयाने हा सर्वांना दिलासादायक ठरणारा आदेश दिला.यासंदर्भात दहावर जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. याचिकेवर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टMaharashtraमहाराष्ट्रelectricityवीज