शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

केडीएमसीत सेना-भाजपात बिग फाइट?

By admin | Updated: October 14, 2015 04:20 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी रीघ लागलेली असतानाच

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी रीघ लागलेली असतानाच शिवसेना आणि भाजपाने स्वतंत्र अर्ज दाखल केल्याने या दोन पक्षांतच बिग फाइट रंगेल असे चित्र निर्माण झाले आहे. युती संदर्भातील सर्व चर्चा फोल ठरल्याने शिवसेनेने सोमवारी रातोरात ए-बी फॉर्मचे वाटप केले, तर भाजपानेही कल्याणमध्ये तसेच काहींच्या घरी जाऊन त्याचे वाटप केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे सात दिवस पितृपक्षात गेल्याने मंगळवारी अखेरच्या दिवशी घटस्थापनेच्या मुहूर्तावर सर्वच पक्षांतील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात बंडखोरी होण्याच्या भीतीने काँग्रेस वगळता सर्वांनाच यादी जाहीरपणे प्रसिद्ध न करता उमेदवारांच्या हाती गुपचूप एबी फॉर्म द्यावे लागले. दरम्यान, आपल्याला डावलल्याचे लक्षात येताच काहींनी अपक्ष उमेदवारी दाखल करून बंडखोरी केल्याचे दिसून आले. तब्बल २२३३ अर्जांची विक्री झालेली असताना १२ केंद्रांवर सुमारे १०३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, उद्या बुधवारी अर्जांची छाननी होणार आहे. शुक्रवार माघारीचा दिवस असून, अंतिम यादी १७ आॅक्टोबरला तयार केली जाणार आहे. यात शिवसेना १२२, भाजपा १२२, मनसे ८८, काँगे्रस ५६, राष्ट्रवादी ४१, एमआयएमच्या ७ अर्जांचा समावेश आहे. २७ गावांतील संघर्ष समितीने बहिष्काराचे हत्यार मागे घेऊन भाजपाकडून अर्ज दाखल केले आहेत.मंगळवारी अखेरच्या दिवशी उमेदवारांची निवडणूक केंद्रावर भाऊगर्दी होणार याअनुषंगाने चोख बंदोबस्त ठेवला होता. परंतु, सुव्यवस्था दृष्टीस पडली नाही. दुपारी ३ वाजेपर्यंतच उमेदवारी दाखल करण्याची वेळ असल्याने सकाळच्या टप्प्यातच उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची केंद्रावर गर्दी झाली होती. त्यांना केंद्राबाहेर पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून थोपवून धरले होते. उमेदवार आणि त्याचे दोन समर्थक वगळता अन्य कोणालाही केंद्रामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. प्रमुख मार्गांवर असलेली निवडणूक कार्यालये, त्यातच सुरू झालेला नवरात्रौत्सव यामुळे शहरात गर्दीला उधाण आले होते. शिवाजी चौक, सहजानंद चौक, अहिल्याबाई चौक, शंकरराव चौक याठिकाणी वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले. निवडणूक केंद्र परिसरात झालेली गर्दी हटविण्यासाठी काहीठिकाणी पोलिसांना लाठीचा ही वापर करावा लागला. २७ गावांचा अपवाद वगळता इतरत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शांततेत पार पडली. दरम्यान एमआयएमदेखील निवडणूक रिंगणात उतरली असून त्यांनी कल्याण पश्चिम आणि पूर्व भागातील मुस्लिम बहुल सात प्रभागात उमेदवार उभे केले आहेत. शिवाय बसपा, रिपाइंसह इतर छोटेमोटे पक्षही रिंगणात आहेत.