शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

कसाऱ्याजवळ अपघातात १ ठार; ९ जखमी

By admin | Updated: July 4, 2016 04:41 IST

मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा गावाजवळ साईखिंड वळणावर दोन गाड्या आणि ट्रकच्या अपघातात एक ठार

कसारा : मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा गावाजवळ साईखिंड वळणावर दोन गाड्या आणि ट्रकच्या अपघातात एक ठार, तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली.या दोन्ही गाड्या मुंबईहून नाशिकला जात होत्या. साईखिंड येथे उतार आणि वळण असल्यामुळे त्या सावकाश जात होत्या. त्याच वेळी मागून भरधाव ट्रक आला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकमधील लोखंडी प्लेट दोन्ही गाड्यांवर पडल्या. यामुळे गाड्या चेपल्या गेल्या. अपघाताचे वृत्त कळताच गॅमन इंडियाचे गस्त पथक, कसारा आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी गेले. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर गाडीत अडकून पडलेल्या जखमींना बाहेर काढण्यात यश आले. या भीषण अपघातात सुनील पाटील (५०) हे ठार झाले, तर रवी रोशलानी (३९), सिमरन रोशलानी (३५), लक्ष्मी अडवानी (५०), धीरज रोशलानी (१०), गुंजन रोशलानी (१२) आणि गाडीचा चालक सागर यांना त्वरित बाहेर काढून नाशिक येथील रुग्णालयात दाखल केले. तर, दुसऱ्या गाडीतून सुनील पाटील यांचा मृतदेह बाहेर काढला. या गाडीतून वंदना पाटील (४५), प्रणाली पाटील (१८), मयूर पाटील (२४) या जखमींना सुरक्षित बाहेर काढले. मयूर आणि वंदना हे आईमुलगा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. (वार्ताहर)नागमोडी वळणांमुळे अपघातअपघात झालेल्या ठिकाणी उतार आणि नागमोडी वळण असल्याने येथे कायम अपघात होतात. या भीषण अपघातानंतर एक कंटेनर आणि टँकर उलटून अपघात झाला. परिणामी, नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.