शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

"माझी आई काही ना काही...", करुणा मुंडेंच्या मुलाच्या पोस्टने खळबळ; धनंजय मुंडेबद्दल काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 17:33 IST

Seeshiv Munde Instagram Story: कोर्टाने पोटगीबाबत दिलेल्या आदेशानंतर करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या मुलाने मोठा खुलासा केला आहे.

Seeshiv Munde Insta Story: मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मांना दोन लाखांची पोटगी देण्याचा आदेश दिला आहे. करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी दाखल केलेल्या घरगुती हिंसाचार तक्रारीच्या सुनावणीदरम्यान वांद्रे कौंटुबिक न्यायालयानेधनंजय मुंडे यांना सूचना दिल्या. न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणातील सुनावणीनंतर करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचे म्हटलं. गेल्या अनेक महिन्यांपासून घराचा हफ्ता भरलेला नाही, त्यामुळे १५ लाख रुपये मिळावे यासाठी हायकोर्टात जाणार असल्याचे करुणा मुंडे म्हणाल्या. मात्र आता करुणा आणि धनंजय मुंडे यांच्या मुलाने आईबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.

माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते नुकसान पोहोचवणारे नाहीत असं विधान धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचा मुलगा सिशिव मुंडे याने केले आहे. त्यामुळे आता करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा मुलगा वडिलांच्या समर्थनार्थ पुढे आल्याचे पाहायला मिळत आहे. वडील आईसोबत कठोर वागले असले तरी ते आमच्या सोबत तसे वागले नाहीत असं सिशिव मुंडेने म्हटलं आहे. सिशिवने इन्स्टाग्राम स्टोरीमधून हा सगळा दावा केला आहे. त्यामुळे आता मुंडे कुटुंबातल्या या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

"मी सीशिव धनंजय मुंडे आहे आणि मला बोलणे महत्वाचे वाटते कारण मिडिया माझ्या कुटुंबाला मनोरंजनाचे साधन बनवत आहेत. माझे वडील कदाचित सर्वोत्कृष्ट नसतील, परंतु ते कधीही आमच्यासाठी नुकसान पोहोचवणारे नव्हते. तिने ज्या कौटुंबिक हिंसाचाराचा दावा केला आहे तो माझ्यावर, माझ्या बहिणीवर आणि माझ्या वडिलांवरही झाला आहे. माझ्या आईने वडिलांना मारहाण केली आणि तेव्हापासून ते निघून गेले. त्यानंतर माझ्या आईने मला आणि बहिणीला सोडून दिले आणि तेथून जाण्यास सांगितले. कारण तिला आमच्याशी काही देणंघेणं नाही, असं सीशिवने स्पष्ट केलं आहे.

"२०२० पासून माझे वडील धनंजय हे माझी काळजी घेत आहेत आणि माझ्या आईला कोणत्याही आर्थिक समस्या नाहीत. माझी आई काही ना काही बहाने बनवत राहते. माझ्या आईने घरावरचं कर्ज सुद्धा फेडलेले नाही. आणि आता ती माझ्या वडिलांविरुद्ध सूडबुद्धीने लढण्यासाठी कथा रचत आहे," असंही सीशिवने म्हटलं आहे.

कोर्टाच्या आदेशानंतर काय म्हणाल्या करुणा मुंडे?

"माझ्या लढ्याला यश आलं आहे. कोर्टाने पहिली पत्नी म्हणून आदेश दिला आहे. बायको नसून, पोटगीसाठी दिलेला नकार यावर कोर्टाने निर्णय दिला आहे. मी कोर्टाच्या निर्णयावर समाधानी नाही. मी या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. माझी दर महिना १५ लाखांची मागणी आहे. माझा एक लाख ७० हजारांचा घराचा हफ्ता आहे. ७ ते ८ महिन्यापांसून हफ्ता भरलेला नाही. ३० हजारांचा मेंटेनन्स आहे. मुलगा घरात बेरोजगार बसला आहे. दोन लाखात काय होणार?," असं करुणा मुंडे यांनी म्हटलं. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेCourtन्यायालय