प्रशांत नाकाडे हत्याकांड खटलानागपूर : कळमन्यातील महाकाळकर सभागृहासमोर घडलेल्या बहुचर्चित डॉ. प्रशांत नाकाडे हत्याकांड खटल्यात आज प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाने आरोपी डॉ. राजेंद्र कापगते याला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हे प्रकरण अपवादातील अपवादात्मक नसल्याने न्यायालयाने सरकार पक्षाने केलेली आरोपीच्या मृत्युदंडाची मागणी नामंजूर केली. तसेच आरोपीकडे अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना असल्याने त्याला शस्त्र कायद्यांतर्गतच्या कारवाईतून निर्दोष ठरवण्यात आले. या खटल्याची पार्श्वभूमी अशी, गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथील रहिवासी प्रशांत धनंजय नाकाडे हे आरोपी राजेंद्र कालिदास कापगते रा. साकोली याचे साळे होते. प्रशांत हे होमिओपॅथी डॉक्टर आणि झाडीपट्टी रंगभूमीचे नामवंत कलावंत होते. कापगते हा एमबीबीएस असून साकोली येथे राज क्लिनिक नावाचे इस्पितळ आहे. हत्याकांडाची घटना १२ फेब्रुवारी २०११ रोजी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास महाकाळकर सभागृहापुढे घडली होती. ‘तो’ एसएमएस ठरला घातकडॉ. राजेंद्र कापगते याची पत्नी नीता ही प्रशांत नाकाडे यांची सख्खी बहीण आहे. राजकीयदृट्या कापगते आणि नाकाडे कुटुंब सधन आहेत. प्रशांतच्या मातोश्री इंदूताई नाकाडे या काही काळ आमदार होत्या. राजेंद्र कापगते याचे काका हेमकृष्ण कापगते सुद्धा काही काळ आमदार होते. आरोपी म्हणाला, ‘वाट्टेल ती शिक्षा द्या’न्यायालयाने आरोपीला फाशी की जन्मठेपेची शिक्षा द्यावी, असा प्रश्न विचारला असता चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप दिसत नसलेला आरोपी म्हणाला, तुम्हाला वाट्टेल ती शिक्षा द्या. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. न्यायालयाने निकालात असे नमूद केले की, सर्वोच्च न्यायालयाने मृत्युदंडासाठी जे मापदंड ठरवून दिले, त्यात हे प्रकरण बसत नाही. त्यामुळे जन्मठेपेचीच शिक्षा पुरेशी आहे. न्यायालयात सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील अॅड. नीरज खांदेवाले तर आरोपीच्यावतीने अॅड. अविनाश गुप्ता यांनी काम पाहिले़
कापगतेला जन्मठेप
By admin | Updated: December 31, 2014 01:11 IST