शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कनकरत्नम, नगराळे यांना महासंचालकपदी बढती; रश्मी शुक्ला यांची गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 02:17 IST

राज्य पोलीस दलातील विशेष अभियानाचे प्रमुख डी. कनकरत्नम व अपर महासंचालक (सामग्री व तरतूद) हेमंत नगराळे यांना गुरुवारी महासंचालकपदी बढती देण्यात आली. त्यांची अनुक्रमे राज्य सुरक्षा महामंडळ व न्यायिक व तांत्रिक (एल अ‍ॅण्ड टी)पदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली.

मुंबई : राज्य पोलीस दलातील विशेष अभियानाचे प्रमुख डी. कनकरत्नम व अपर महासंचालक (सामग्री व तरतूद) हेमंत नगराळे यांना गुरुवारी महासंचालकपदी बढती देण्यात आली. त्यांची अनुक्रमे राज्य सुरक्षा महामंडळ व न्यायिक व तांत्रिक (एल अ‍ॅण्ड टी)पदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली. तर गेल्या सुमारे पावणे दोन वर्षांपासून पूर्णवेळ अधिकाऱ्यापासून रिक्त असलेल्या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्तपदी महामार्ग पोलीस विभागाच्या अपर महासंचालक रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनंतर गृह विभागाने गुरुवारी त्याबाबतचे आदेश जारी केले. महासंचालक पदाच्या दोन रिक्त पदांबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने १ आॅक्टोबरला दिले होते. सेवाज्येष्ठतेच्या आधारावर कनकरत्नम व नागराळे यांना बढती देण्यात आली असून दोघेही जण १९८७च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे राज्यातील डीजीची मंजूर असलेली सर्व आठ पदे भरण्यात आली आहेत.एसीबीच्या महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेल्या संजय बर्वे यांच्याकडे गेल्या पावणे दोन वर्षांपासून एसआयडीचा अतिरिक्त पदभार होता. या ठिकाणी यापूर्वीया पदावर काम पाहिलेल्या रश्मी शुक्ला यांच्यावर पुन्हा ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.याचप्रमाणे आस्थापना विभागाचे अपर महासंचालक असलेले संदीप बिष्णोई यांची महामार्ग वाहतूक पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांचा अतिरिक्त पदभार अपर महासंचालक (प्रशासन) प्रज्ञा सरवदे यांच्याकडे सोपवण्यात देण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Policeपोलिस