शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

खंडित वीजपुरवठ्याने कामशेतवासीय हैराण

By admin | Updated: May 19, 2016 02:27 IST

मावळात अनेक ठिकाणी खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर असून, कामशेत शहरातील ठरावीक काही भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.

कामशेत : मावळात अनेक ठिकाणी खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर असून, कामशेत शहरातील ठरावीक काही भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. वीजपुरवठा कमी दाबाचा असल्याने व्यावसायिक व नागरिक त्रस्त झाले आहेत.शहरातील देवराम कॉलनी, संभाजी चौक, शिवाजी चौक ते मंगल कार्यालयापर्यंतच्या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. पुरवठा कमी दाबाचा होत असल्याच्या तक्रारी नागरिक महावितरण कार्यालयात करत आहेत. या भागांमध्ये पिठाच्या गिरण्या, वेल्डिंग शॉप, हॉस्पिटल, हॉटेल, लाँड्री व्यावसायिक, इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकलची दुकाने, प्रिंटिंग प्रेस आदी विजेची आवश्यकता असलेले व्यवसाय आहेत. वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, तसेच कमी दाब यांमुळे अनेक व्यावसायिक यंत्रे चालत नाहीत, तसेच त्यांच्यात बिघाड होतो. परिणामी, त्यांचे आर्थिक नुकसान तर होतेच, शिवाय यंत्रांच्या सततच्या बिघाडाने डोकेदुखी वाढली आहे.महावितरण कार्यालयात तक्रार द्यायला गेल्यास अधिकारी उपस्थित नसतात. वायरमन व कंत्राटी कामगार चिरीमिरी दिल्याशिवाय काम करत नाही, असे तक्रारदार सांगतात. प्रशासनाचा वचक नसल्याने वीज ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट होते. भरमसाठ बिल भरूनही सेवा दिली जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रविवारी सांयकाळी सहा वाजता वीजपुरवठा खंडित झाला, तो सकाळीच सुरू झाला. याविषयी अधिकाऱ्याला विचारले असता, रात्रपाळीला कामगार नसतात, असे उत्तर मिळाले. संभाजी चौकातील एका हॉस्पिटलमध्ये रविवारी प्रसूतीची रुग्ण असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने, तसेच हॉस्पिटलचे जनरेटर अचानक नादुरुस्त झाल्याने हॉस्पिटल व्यवस्थापकांना मोठी कसरत करावी लागली. महावितरणच्या गलथान कारभाराने नागरिक हैराण असून, रात्री वीज खंडित झाल्यास ती परत येणे रामभरोसे आहे. विजेअभावी कुलर, पंखे आदी उपकरणे बंद होत असल्याने उन्हाळ्यातील असह्य उकाडा नागरिकांना सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)>कित्येक महिने तक्रार देऊनही कोणतीही दखल घेतली जात नाही. विजेच्या कमी दाबामुळे आमच्या अनेक वैद्यकीय मशिन काम करत नाहीत. महावितरण कार्यालयात अधिकारी नसतात. सर्वच कारभार रामभरोसे चालू आहे, असे एका खासगी हॉस्पिटलकडून सांगण्यात आले.देवराम कॉलनीतील रोहित्राची वीजपुरवठा क्षमता कमी असून, त्यावर जास्त वीज कनेक्शनचा भार असल्याने वारंवार एक फेज जातो. नवीन रोहित्र मंजूर झाले असून, ते बसवण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने ही अडचण होत आहे, असे महावितरण अधिकारी राणे यांनी सांगितले.