शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीचा ५० टक्के खर्च केंद्र उचलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 19:30 IST

कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे करत असलेल्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाचे आणखी एक पाऊल पुढे पडले असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पातील ५० टक्के वाटा उचलण्यास आज मान्यता दिली.

ठाणे, दि. ३१ - कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे करत असलेल्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाचे आणखी एक पाऊल पुढे पडले असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पातील ५० टक्के वाटा उचलण्यास आज मान्यता दिली. श्री. गडकरी यांच्यासमोर या प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल, तसेच प्राथमिक सविस्तर प्रकल्प अहवालाचे सादरीकरण सोमवारी झाले असता त्यांनी ठाणे महानगरपालिकेला प्रकल्पाचा अंतिम सविस्तर अहवाल बनवण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी खा. डॉ. शिंदे, राजन विचारे आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित होते. ठाणे आणि त्यापुढील रहिवाशांना किफायतशीर प्रवासाचा समर्थ पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक सुरू व्हावी, यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. प्रकल्पाला मंजुरी मिळावी, यासाठी खा. डॉ. शिंदे आणि राजन विचारे यांनी दिल्लीत सातत्याने पाठपुरावा केला होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात श्री. गडकरी यांच्याकडे झालेल्या बैठकीनंतर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेत व्यवहार्यता अहवाल आणि प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार केला. त्याचे सादरीकरण सोमवारी श्री. गडकरी यांच्याकडे झाले. पहिल्या टप्प्यात कल्याण-ठाणे-वसई-मीरा भाईंदर हा जलमार्ग विकसित करण्यात येणार असून त्यासाठी ४५३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या अंतर्गत कल्याण, डोंबिवली, दिवा, कळवा, काल्हेर, कोलशेत, नागला बंदर, घोडबंदर रोड, मीरा भाईंदर, वसई किल्ला या ठिकाणी जेट्टी उभारण्यात येणार आहेत. श्री. गडकरी यांनी ठाणे महापालिकेला अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्याचे निर्देश देताना प्रकल्पातील खर्चाचा ५० टक्के वाटा उचलण्यास मान्यता दिली आहे. कल्याण/ठाण्याला मिळणार अँफिबियस बस हायब्रिड टेक्नॉलॉजीवर आधारित, पाणी आणि रस्त्यावरही चालू शकणारी अँफिबियस बस कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी खा. डॉ. शिंदे आणि राजन विचारे यांनी केली. त्यावर आयात करण्यात आलेली एक अँफिबियस बस जेएनपीटी येथे उपलब्ध असून ती ठाणे महापालिकेला देण्याची तयारी श्री. गडकरी यांनी दाखवली. त्यामुळे लवकरच ठाणे महापालिकेच्या ताब्यात ही बस येणार असून सध्या उपलब्ध असलेल्या जेट्टींच्या आधारे तिची वाहतूकही सुरू करता येणार आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडीतूनही मुक्तता ठाणे शहरातून जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्गावर दिवसभर होणारी वाहतूक कोंडी, तसेच तीन हात नाका येथील सिग्नलमुळे होणारा वाहतुकीचा खोळंबा यावर उपाययोजना करण्यासाठी ठाणे महापालिकेने तयार केलेल्या ग्रेड सेपरेटर प्रकल्पाचे सादरीकरणही याप्रसंगी श्री. गडकरी यांच्यासमोर झाले. त्यावेळी ठाणे महापालिकेने मुलुंड पूर्व हद्दीवरील टोल नाका ते खारेगाव टोलनाका पर्यंतचा रस्ता वाहतूककोंडी मुक्त करण्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश श्री. गडकरी यांनी दिले. त्यामुळे लवकरच ठाणेकरांची महामार्गावरील वाहतूक कोंडीतूनही मुक्तता होणार आहे.