शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लाखो भक्तांच्या अपूर्व उत्साहात रंगली जोतिबाची चैत्र यात्रा

By admin | Updated: April 21, 2016 23:18 IST

‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर; भाविकांची मांदियाळी, गुलालात न्हावून गेला परिसर

 
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २१- ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा अखंड गजर, सजलेल्या, गगनाला भिडणा-या सासनकाठय़ा, खोब-याचे तुकडे-गुलालाची उधळण, हलगी-ताशांचा कडकडाट.. लाखोंच्या संख्येने आलेल्या आबालवृद्ध भाविकांची मांदियाळी अशा मंगलमयी वातावरणात ‘दख्खनचा राजा’ श्री जोतिबा देवाची चैत्र यात्र गुरुवारी मंगलमयी वातावरणात पार पडली. देशाच्या कानाकोप-यांतून आलेल्या भाविकांच्या अलोट गर्दी आणि भक्तिमय गुलालाच्या उधळणीने अवघा डोंगर न्हाऊन निघाला. 
महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यांतील भाविकांचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या जोतिबा देवाची चैत्र यात्रा म्हणजे वर्षभरातला सर्वात मोठा उत्सव. यानिमित्त गुरुवारी पहाटे देवाची काकड आरती, पाद्यपूजा झाली. पन्हाळ्याचे तहसीलदार रामचंद्र चोबे यांच्या हस्ते देवाला शासकीय अभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवाची सरदारी रूपात बैठी सालंकृत पूजा बांधण्यात आली. पूजेनंतर देवाची मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली. 
दुपारी एक वाजता निनाम पाडळी (जि. सातारा) गावची प्रथम क्रमांकाची मानाची सासनकाठी जोतिबा मंदिराच्या आवारात दाखल झाली. उत्तर दरवाजा येथे या काठीचे पूजन आमदार सतेज पाटील, पाटणचे आमदार शंभूराजे देसाई यांच्या हस्ते  झाले. त्यानंतर पाटणमधील विहे गावच्या दुस-या क्रमांकाच्या काठीचे पूजन झाले. या पूजेनंतर सासनकाठय़ांच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला.
यात्रेसाठी गेल्या दोन दिवसांपासूनच लाखो भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले होते. राज्यासह परराज्यांतील कानाकोप-यांतून लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांच्या गर्दीने डोंगर परिसर फुलून गेला होता. खोब-याचे बारीक तुकडे आणि गुलालाच्या उधळणीने मंदिराचा परिसर, आलेले नागरिक, भाविक गगनचुंबी सासनकाठय़ांचा भार हातांवर पेलत ढोल-ताशा, हलगीच्या कडकडाटात नृत्य करत होते. चारीही बाजूंनी त्यांना दोरीच्या साहाय्याने आधार देणारे हात हा तोल सांभाळत होते. 
जोतिबा देवस्थानाच्या मानाच्या सासनकाठय़ा 98 आहेत. अन्य मानकरी असे मिळूण एकूण 108 सासनकाठय़ा आहेत. याशिवाय प्रत्येक गावातील सासनकाठी वेगळी. अशारीतीने शेकडोच्या संख्येने आलेल्या सासनकाठय़ांची क्रमांकानुसार मिरवणूक सुरू झाली; तर मंदिराच्या बाह्य परिसरात भाविक यात्रेचा मनमुराद आनंद लुटत होते. संध्याकाळी साडेपाचनंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.
 
 
 
राज्यात चांगला पाऊस पडू दे 
पावसाने ओढ दिल्याने यंदा राज्यावर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाला बळ  दे, यंदा राज्यात चांगला पाऊस पडू. राज्याला भेडसावणारा दुष्काळाचा प्रश्न कायमचा सुटू दे, यासाठीच मी आज जोतिबा देवाकडे साकडे घातले आहे. महाराष्ट्रावर आलेल्या  दुष्काळावर मात करून राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे, अशी प्रार्थना केली. 
- चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री कोल्हापूर 
---------------
परंपरा खंडित 
 चैत्री पौर्णिमेत जोतिबा यात्रेचा खरा मान सासनकाठय़ांना असतो. त्यामुळे मानाच्या पहिल्या निनाम पाडळीच्या सासनकाठीचे पूजन दुपारी दीड वाजता पालकमंत्र्यांच्या हस्ते होते. अशी गेली कित्येक वर्षाची परंपरा आहे; परंतु ही प्रथा यंदा खंडित झाली.कोल्हापूरचे  पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना मुंबई येथे बैठक असल्याने त्यांच्या हस्ते या मानाच्या सासनकाठीचे सकाळी साडेनऊ वाजता पूजन केले. यावेळी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, जिल्हाधिकारी डॉ.अमितकुमार सैनी, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, पन्हाळा प्रातांधिकारी रवींद्र खाडे, तहसीलदार रामचंद्र चोबे, देवस्थान समिती सचिव शुभांगी साठे, सहसचिव शिवाजी साळवी आदी उपस्थित होते.
------------------------
खोब:याची उधळण झाली कमी
गेले कित्येक वर्षे चैत्री जोतिबा यात्रेत गुलाल-खोब:याची उधळण करण्याची प्रथा आहे. त्यामुळे खोब:याचे मोठे तुकडे भाविकांना इजा करत होते. त्याची दखल घेत प्रशासनाने जोतिबा डोंगरावरील दुकानदारांना खोब-याच्या अखंड वाटय़ा विक्रीसाठी ठेवायच्या नाहीत, असे फर्मान काढले होते. त्यामुळे खोब-याच्या वाटीचे बारीक-बारीक तुकडे करून ते विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे गुरुवारी यात्रेत खोबरे उधळण कमी झाल्याचे चित्र दिसत होते. 
 
बैलगाडीतून येणा:या भाविकांची संख्या रोडावली
लातूर, उस्मानाबाद, बीड, पंढरपूर, जत, आटपाडी तसेच  कर्नाटकातील काही भागांतून प्रतिवर्षाप्रमाणो बैलगाडीतून केवळ चैत्री जोतिबा यात्रेकरीता येणा-या भाविकांची संख्या मोठी होती. मात्र, यंदा दुष्काळामुळे या बैलगाडीतून यात्रेसाठी येणा-या भाविकांची संख्या रोडावल्याचे चित्र जोतिबा डोंगर (वाडी रत्नागिरी) येथे दिसत होते.