- मनीषा म्हात्रे, मुंबईपुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ‘सनातन’चा सक्रिय कार्यकर्ता समीर गायकवाडच्या अटकेपाठोपाठ ज्योती कांबळे या तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने या हत्याकांडाचे मुंबई कनेक्शनही समोर आले. गेल्या तीन महिन्यांपासून भांडुपगावात ती राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच बुधवारी तिला येथून ताब्यात घेत चौकशी सुरू केली.मूळची सातारा येथील रहिवासी असलेली ज्योती कुटुंबीयांसोबत भांडुप पश्चिमेकडील उत्कर्षनगरमध्ये वास्तव्यास होती. सनातनची सक्रिय कार्यकर्ती असलेली ज्योती समीर गायकवाडची खास मैत्रीण आहे. पानसरे यांच्या हत्येनंतर पोलिसांचा ससेमिरा मागे लागण्याची शक्यता गृहीत धरून एका दलालामार्फत ज्योतीने पूर्वेकडील भांडुप गावठाण परिसरातील इंदुमती सोसायटीत घर घेतले. त्यानंतर जुलै महिन्यापासून ज्योती ही आई, वडील, बहीण आणि बेस्टमध्ये काम करणाऱ्या भावासोबत येथे वास्तव्यास होती. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात पानसरे यांची हत्या झाली त्या काळात ज्योतीने खासगी बँकेतील चांगल्या पदावरील नोकरी सोडल्याची माहिती समोर येत आहे. वडिलांच्या आजारपणामुळे नोकरी सोडल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. ज्योतीही ‘सनातन’ साधकज्योती ही सनातनची जुनी साधक आहे. समीरसोबत असलेल्या मैत्रीसंबंधामुळे दोघांचे फोनवर बोलणे सुरू होते. हत्या प्रकरणात समीरचा आणि तिचाही काहीही संबंध नाही. चौकशी करून तिला लवकरच सोडण्यात येईल, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ज्योती कांबळे भांडुपमध्ये राहणारी
By admin | Updated: September 19, 2015 03:31 IST