शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

जुहू गल्ली झाली सुन्न

By admin | Updated: July 1, 2016 04:13 IST

वायरलेस रोडवरील निगम मिस्त्री चाळीतील वफा मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोर्सला सकाळी सहाच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत एकत्र कुटुंबातील ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला

मनोहर कुंभेजकर,

मुंबई- अंधेरी पश्चिमेतील जुहू गल्ली येथील वायरलेस रोडवरील निगम मिस्त्री चाळीतील वफा मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोर्सला सकाळी सहाच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत एकत्र कुटुंबातील ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला. पाच चिमुरड्यांना या घटनेत जीव गमवावा लागल्याने या घटनेची तीव्रता अधिकच वाढली. या घटनेनंतर जुहू गल्लीसह परिसरातील वातावरण शोकाकूल बनले होते. परिसरातील सर्व दुकाने बंद होती. या अग्नीतांडवाला जबाबादार कोण? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सुमारे १२० चौ.फूट जागेत वफा मेडिकल हे दुकान वासिम गेल्या अनेक वर्षांपासून चालवतो आणि त्याचे वडील मोझिन खान यांचे एकत्र कुटुंब गेल्या ४० वर्षांपासून येथे वास्तव्यास आहे. दुकानावरच पहिल्या आणि दुसऱ्या माळयावर त्याचे कुटुंब राहते. सध्या रमझानचा महिना सुरु असल्यामुळे पहाटे लवकर उठून या कुटुंबाने भोजन केले. नमाज पढला. मग हे कुटुंब झोपी गेले. सकाळी सहाच्या सुमारास या मेडिकल स्टोर्समधून धूर आणि फटाके फुटल्यासारखा आवाज येऊ लागला. त्यावेळी धूर आणि आवाज कुठून येतो? हे पाहण्यासाठी वडील मोझिम खान आणि त्यांची दोन मुले निझाम आणि इम्तियाझ या तिघांनी लागून असलेल्या शेजारच्या घरात उड्या मारल्या. तोपर्यंत या मेडिकल स्टोर्सला लागलेली आग आणि धूर वेगाने पसरत गेला. त्यातच पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी मेडिकल स्टोर्समधूनच छोटासाच जिना असल्यामुळे येथील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर विश्रांती घेत असलेले त्यांचे कुटुंब आगीतून बाहेर पडू शकले नाही. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. शॉर्ट सर्किटमुळे मेडिकल दुकानाला आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज रहिवाशांनीही वर्तवला. वफा मेडिकल अ‍ॅन्ड जनरल स्टोअर्समधील औषधे जळून काळी ठिक्कर पडली होती. घटनास्थळी जणू या औषधांचा सडा पडला होता. तर येथील वायरिंग लोंबकळत्या स्थितीत होती. पंख्याचे पाते देखील आगीत जळून खाक झाले. या मेडिकलचा परिसर जणू चिखलमय झाला होता. पोलिसांनी दुकानाचा परिसर निळ्या ताडपत्रीने झाकला. मात्र येथील बघ्यांची आणि नागरिकांची जमलेली गर्दी कमी करण्यासाठी डी. एन. नगर पोलिसांना मात्र तारेवरची कसरत करावी लागत होती. येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.परिसरात पाणीटंचाई असतांना आपल्या घरातील साठवलेले पाणी नागरिकांनी आग विझावण्यासाठी वापरले. नागरिक आणि तरुणांनी एकत्र येऊन पाण्याने ८०टक्के आग विझवल्यानंतर ३०-४० मिनिटांनी आगीचे बंब घटनास्थळी पोहोचल्याचे प्रत्यक्षदर्शी मोहम्मद अली नागोरी या दुकानदाराने सांगितले. अग्निशामक केंद्राला आगीची वर्दी देण्यासाठी तीनवेळा आपल्या मोबाईलवरून फोन केले, मात्र आगीचे बंब येण्यास उशीर झाल्याचेही नागोरी म्हणाले. आग विझवल्यानंतर घराचे पत्रे तोडून नागरिकांनी घरात प्रवेश केला आणि आगीत अडकलेल्या नागरिकांना पोलिस व्हॅन, रिक्षाच्या सहाय्याने जवळील कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कूपर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. हॉस्पिटलमध्येही मृतांच्या नातेवाईक आणि नागरिकांनी गर्दी केली होती.ही घटना आग नसून घातपात असल्याचा आरोप शिवसेना शाखा क्रमांक ६१चे शाखाप्रमुख प्रसाद आयरे यांनी केला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणत वीजचोरी आणि अनाधिकृत वीज कनेक्शन असल्याचेही त्यांनी सांगितले. पावसाळा आणि घरातील वीज कनेक्शनकडे केलेले दुर्लक्ष म्हणून ही दुर्घटना घडली असावी, असेही ते म्हणाले. रात्री उशीरा इर्ला दफनभूमीत सर्व मृतांवर दफनविधी करण्यात आले. >अंधेरी आगीची चौकशी होणारअंधेरी पश्चिम येथील मेडिकल स्टोअरला लागलेल्या आगीचे तीव्र पडसाद स्थायी समिती व पालिकेच्या महासभेत उमटले़ या दुकानाला परवाना नव्हता, असे उजेडात आले आहे़ तसेच आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या घरावरील गच्चीही बेकायदा असल्याचे समोर आले आहे़ त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे़ दरम्यान, या दुर्घटनेतील बळींना श्रद्धांजली वाहून दोन्ही सभा तहकूब करण्यात आल्या़ जुहू गल्लीतील दुमजली निगम मेस्त्री चाळीच्या तळमजल्यावर असलेल्या मेडिकल स्टोअरला आज सकाळी आग लागली होती़ या दुर्घटनेत नऊजण मृत्युमुखी पडल्याने सभा तहकूब करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली़ बेकायदा बांधकाम, सुरक्षेकडे दुर्लक्ष आणि अरुंद गल्लयांमुळे बचावकार्यात अडथळा असे मुद्दे चर्चेत आले़ घरमालकाने हे दुकान भाड्याने दिले होते़ मात्र या मेडिकल स्टोअरला परवाना देण्यात आलेला नव्हता, असे शिवसेनेच्या अनुराधा पेडणेकर यांनी निदर्शनास आणले़ या दुमजली घरावरील गच्चीही बेकायदा असल्याचे यावेळी सांगण्यात आले़ त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली़ या आगीची चौकशी करणार असल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांदळे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)