शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
4
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
5
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
6
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
7
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
8
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
9
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
10
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
11
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
12
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
13
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
14
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
15
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
16
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
17
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
18
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
19
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
20
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला

जॉन्सन, ‘लोकमत’तर्फे हेल्दी बेबी कॅम्प

By admin | Updated: August 3, 2016 00:50 IST

सुदृढ निरोगी बाळ प्रत्येक माता-पित्यांचे स्वप्न असते.

पुणे : सुदृढ निरोगी बाळ प्रत्येक माता-पित्यांचे स्वप्न असते. चांगली व स्वस्थ मुले, निरोगी कुटुंब, जाणकार समाज आणि समृद्ध भारत अशी टप्प्याटप्प्याने विकसित होणारी आपली संस्कृती. याचअंतर्गत हेल्दी बेबी कॅम्प ही संकल्पना घेऊन जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन व ‘लोकमत’ने एका भव्य कॅम्पचे आयोजन केले आहे.हेल्दी बेबी कॅम्प दि. ७ आॅगस्ट रोजी होणार आहे. सर्वाधिक मातांचा लाडका ब्रॅन्ड असलेल्या जॉन्सन आणि जॉन्सन आणि सामाजिक बांधिलकी जपत जपत क्रांती घडविणाऱ्या ‘लोकमत’ने एक वेगळी संकल्पना घेऊन हा उपक्रम हाती घेतला आहे. १०० हून अधिक वर्षांसाठी जॉन्सन बेबी हे बाळाच्या शुश्रूषा विज्ञानांमध्ये आघाडीवर राहिले आहे. हा वारसा प्रदीर्घ आहे. ज्यातून पिढी दर पिढी प्रत्येक पालकाने आपल्या बाळाला दिलेला विश्वासाचा स्पर्श आहे. असा स्पर्श जो जोपासतो बाळाचे आरोग्य, बाळाचे निरोगीपण आणि मातापित्यांचा अतूट विश्वास आणि म्हणूनच जॉन्सनचे उत्पादन आईच्या मातृत्वावर आणि विज्ञानाच्या आधारावर निर्माण करण्यात आली असून, जगभरातील हजारो मातांद्वारे खऱ्या अर्थाने घरांमध्ये चाचणी केली जाते, ज्यावर असतो मातेचा संपूर्ण विश्वास. ज्या विश्वासावर तिचं बाळ घडत जातं. जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन आणि लोकमत वृत्तपत्र समूहाने आयोजित केलेला हा कॅम्प एका निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न होय. मागील वर्षी पण अशा पद्धतीचे कार्यक्रम गोवा आणि महाराष्ट्रात राबविले गेले होते. ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून हेल्थ जागृती वाढवून येणाऱ्या पिढीला संजीवनी देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमांमार्फत होणार आहे हे निश्चित. तेव्हा या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन जागरूक पालकांची भूमिका निभावण्याची संधी या निमित्ताने जॉन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन व लोकमत यांनी दिली आहे. त्या संधीचा पुरेपूर फायदा समस्त पालकांनी घ्यावा आणि या कॅम्पला भव्यदिव्य स्वरूप प्राप्त करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. इंडियन अ‍ॅकेडमी आॅफ पेडियाट्रिक्स ही भारतातील बालरोग चिकित्सकांची सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे, जी आरोग्याच्या सुधारणेसाठी आणि बाळांच्या हितासाठी सतत झटत असते. याच अनुषंगाने डॉ. जयंत जोशी, डॉ. ललित रावळ, डॉ. संजय नातू यांच्या नेतृत्वाखाली मंत्रा बँक्वेट, वनाज कंपनीशेजारी, कोथरूड येथे या कॅम्पचे आयोजन केले आहे. या कॅम्पमध्ये आपल्या बाळांच्या आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्नांचा विचार करून त्यावर सखोल मार्गदर्शन केले जाईल. (प्रतिनिधी)>तज्ज्ञ चिकित्सकांद्वारे होणार तपासणीभारताचे शिशुरोगतज्ज्ञांची सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारी संस्था इंडियन अ‍ॅकॅडमी आॅफ पीडियाट्रिक्स (आयएपी) आहे. ही संस्था बालकांच्या आरोग्य सुधारणेसाठी व त्यांच्या हितार्थ सतत प्रयत्नशील आहे. आयएपीचे तज्ज्ञ या कॅम्पमध्ये तपासणी करणार आहेत. ते बालकांच्या पोषणाबाबत मार्गदर्शन करतील. बालकांच्या आरोग्याबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा देणार आहेत.या कॅम्पमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक बाळाला प्रमाणपत्र व जॉन्सन अँड जॉन्सनतर्फे आकर्षक गिफ्ट हॅम्पर मिळणार आहे. तसेच संपूर्ण परिवारासाठी एक नावीन्यपूर्ण इस्टंट फोटोबूथ उपलब्ध केला गेला आहे. ज्यामध्ये प्रत्येक परिवारास स्वत:चा एक अविस्मरणीय फोटो व फ्रेम मिळणार.कॅम्प रविवारी, दि. ७ आॅगस्ट रोजी सकाळी ९ ते १२ या वेळात होणार आहे. कार्यक्रम नि:शुल्क असून, सर्व पालकांसाठी खुला आहे. वनाज कंपनीशेजारील मंत्रा बँक्वेट येथे हा कार्यक्रम होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : लोकमत कार्यालय 0२0-६६८४८५८६.