शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

जॉन्सन अँड जॉन्सनच्या चुकीचा राज्यातील ३४८ रुग्णांना फटका; सदोष प्रत्यारोपणाचा करणार तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 01:51 IST

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या चुकीचा राज्यातील ३४८ रुग्णांना फटका बसला आहे. सदोष उपकरणांद्वारे ‘हिप’ (खुबा) प्रत्यारोपण झालेल्या या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.

मुंबई : जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या चुकीचा राज्यातील ३४८ रुग्णांना फटका बसला आहे. सदोष उपकरणांद्वारे ‘हिप’ (खुबा) प्रत्यारोपण झालेल्या या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.कंपनीने प्रत्यारोपण उपकरणांची भारतात विक्री केली, पण त्यातील दोषांमुळे रुग्णांच्या रक्तात विषजन्य घटक पसरले. काहींना कायमचे अपंगत्व आले. त्याबद्दल रुग्णांना २० लाख रुपये भरपाईचे आदेश केंद्रीय औषधे प्रमाणिकरण संघटनेने कंपनीला दिले. देशातील ४,७०० पैकी ३,६०० रुग्णांचा शोध सुरू असून, ३४८ रुग्ण महाराष्टÑातील आहेत.रुग्णांचा शोध घेण्यासाठी राज्य सरकार विशेष समिती स्थापना करणार आहे. या समितीमध्ये दोन अस्थिव्यंग तज्ज्ञ, एक रेडिओलॉजिस्ट व अन्न-औषधे प्रशासनातील अधिकाऱ्याचा समावेश असेल. राज्याचे औषधे नियंत्रक अमृत निखाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, काही रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचणे आव्हान असेल. त्या रुग्णांना प्रत्यारोपणानंतर कुठला त्रास झाला, त्याची तपासणी करायची आहे.अशी मिळेल नुकसान भरपाई- रुग्णांनी सीडीएससीओकडे अर्ज करणे. सीडीएससीओची केंद्रीय तज्ज्ञ समिती ३० दिवसांत निर्णय घेऊन अर्ज राज्याच्या समितीकडे पाठवेल.- राज्य समिती ६० दिवसांत त्यावर निर्णय घेईल.- समितीच्या शिफारशीनुसार तज्ज्ञ समिती भरपाईची रक्कम निश्चित करेल. भरपाई देण्याबाबत सीडीएससीओ कंपनीला निर्देश देईल.- कंपनीकडून रुग्णाला भरपाईची रक्कम मिळेल. कंपनीने टाळाटाळ केल्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालय कारवाई करेल.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रhospitalहॉस्पिटल