शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: जोगेश्वरी टर्मिनस डिसेंबर २०२५ पर्यंत सुरु होणार- रविंद्र वायकर

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 1, 2025 19:38 IST

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसवरून गावाला जाण्याचे जोगेश्वरीकारांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

मनोहर कुंभेजकर, मुंबई: जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसवरून गावाला जाण्याचे जोगेश्वरीकारांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. जोगेश्वरी टर्मिनसचे काम युद्ध पातळीवर सुरु असून डिसेंबर २०२५ पासून हे टर्मिनस कार्यान्वित करण्याचा रेल्वेचा मानस आहे. मुंबई उत्त्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिंदे गताचेवखासदार रविंद्र वायकर यांनी नुकतीच या टर्मिनसच्या कामाची पाहणी केली, यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हे आश्वासन दिले. 

अमृत भारत या योजनेच्या माध्यमातून देशातील विविध रेल्वे स्टेशनचे काम करण्यात येत आहे. जोगेश्वरी येथे रेल्वेची जागा उपलब्ध असल्याने येथे टर्मिनस बनवण्यात यावे अशी मागणी खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत केली होती. याप्रश्नी त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन निवेदनही दिले होते. 

या ठिकाणी एकूण ३ प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मालवाहतुकीसाठी वेगळा प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहे. येथे लिफ्ट, सरकते जिने, अंडरग्राउंड पार्किंगची सुविधा, सोलर, मेट्रोची कनेक्टीव्हिटी, पूल करण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी मल्टीमोडेल कनेक्टीव्हिटी सुविधाही करण्यात यावी अशी सुचना खासदार वायकर यांनी यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केली होती. या टर्मिनसचे काम टप्प्या टप्प्याने पूर्ण करण्यात येणार असून सुरुवातीला दोन प्लॅटफॉर्म सुरु करण्यात येणार असून प्रथम राजस्थान व गुजरात येथे गाड्या सोडण्यात येणार, असल्याची माहिती रेल्वेचे अधिकाऱ्यांनी दिली. या टर्मिनसवरून कोकणात जाण्यासाठीही गाड्या सोडण्यात येणार असल्याचे खासदार वायकर यांनी यावेळी सांगितले.

या पाहणी दौऱ्यावेळी रेल्वेचे उपमुख्य अभियंता ए.के.आर्या, अमित गायकवाड, विवेक कुमार, नरसिंगराव, अमित खरवंदे, अशोक मालविया, मनपाच्या पी दक्षिण कार्यालयांचे सहाय्यक आयुक्त अजय पाटणे, ज्ञानेश्वर सावंत, माजी नगरसेवक सदानंद परब, स्वप्नील टेंबवलकर, साधना माने, रेखा रामवंशी, प्रियांका आंबोलकर, अशोक चाचे, जितेंद्र जनावळे, मिलिद कापडी, पूनम वैद्य, भाई मिर्लेकर, स्मिता बावधने, अमित पिळणकर,शिंदे सेनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र