शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नियतीनेच देवेंद्र फडणवीसांना घरी बसवले- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 07:10 IST

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता रडत बसले आहेत. ते म्हणताहेत की, वर्गात पहिला आलो तरी मला वर्गाच्या बाहेर बसवले आहे.

कासा : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता रडत बसले आहेत. ते म्हणताहेत की, वर्गात पहिला आलो तरी मला वर्गाच्या बाहेर बसवले आहे. पण नियतीनेच फडणवीसांना घरी बसवले आहे, अशी जोरदार टीका कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. डहाणू तालुक्यातील कासा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी वाडा येथील आमदार सुनील भुसारा, माजी खासदार शंकर नम, जिजाऊ संघटनेचे प्रमुख नीलेश सांबरे, राष्ट्रवादी डहाणू अध्यक्ष राजेश पारेख, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, कॉ. बारक्या मंगात, रफिक घांची, काशीनाथ चौधरी व या भागातील उमेदवार उपस्थित होते.जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, भाजपवाले जातीधर्माचे राजकारण करत आहेत. रहिवासी पुरावे मागत आहेत. हा देश आमचा आहे. यांना ६१ सालचे पुरावे कुठून आणणार? या ग्रामीण भागात इंटरनेट नाही. मोखाडा, जव्हारमध्ये अनेक समस्या आहेत. त्यामुळे पाच वर्षे आम्हाला सत्ता द्या. जिल्हा परिषदेत चांगली कामे करून दाखवतो. ही प्रचाराची सभा नाही तर विश्वासाची सभा आहे, असा टोला त्यांनी हाणला. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कासा भागात येऊन प्रचार करून गेले होते.या वेळी डहाणू तालुक्यातील शिवसेनेचे डहाणू तालुका संघटक संतोष वझे व त्यांचा सहकाऱ्यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सभेत बोलताना नीलेश सांबरे म्हणाले की, अनेक नेते येऊन आदिवासी व इतर समाजात भांडणे लावत आहेत. पालघर जिल्हा परिषद हंडामुक्त करायची आहे. शिक्षण, आरोग्य याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या वेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. या वेळी माजी मंत्री शंकर नम यांचेही भाषण झाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड