शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिरी वेस्ली याला विजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 04:45 IST

बेलारूसच्या एगोर गेरासीमोव्ह याला नमवून झेक प्रजासत्ताकच्या जिरी वेस्ली याने रविवारी तिसऱ्या महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बेलारूसच्या एगोर गेरासीमोव्ह याला नमवून झेक प्रजासत्ताकच्या जिरी वेस्ली याने रविवारी तिसऱ्या महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर झालेल्या अंतिम फेरीत वेस्लीने आठव्या मानांकित एगोरचा ७-६ (२), ५-७, ६-३ असा पराभव करत विजेतेपद पटकावले. दुहेरी गटात इंडोनेशियाचा ख्रिस्तोफर रुंगकॅट व स्वीडनचा आंद्रे गोरसन ही जोडी विजेती ठरली. त्यांनी अंतिम फेरीत इस्त्राईलच्या जोनाथन एर्लिच व बेलारूसच्या आंद्रे वासिलेव्हस्की या तिसºया मानांकित जोडीवर ६-२, ३-६, १०-८ने मात केली.२ तास १२ मिनिटे रंगलेल्या एकेरीच्या अंतिम लढतीत २६ वर्षीय वेस्लीने कडवी झुंज देत बाजी मारली. पहिल्या सेटमध्ये बाराव्या गेमपर्यंत ६-६ अशी बरोबरी झाल्याने हा सेट टायब्रेकपर्यंत ताणला झाला. टायब्रेकमध्ये वेस्लीने आक्रमक खेळ करत एगोरला कोणतीही संधी न देता सरशी साधत आघाडी घेतली. दुसरा सेटही चुरशीचा झाला. दहाव्या गेमअंती ५-५ अशी बरोबरी असताना अकराव्या गेममध्ये एगोरने जिरी वेस्लीची सर्व्हिस भेदली व बाराव्या गेममध्ये स्वत:ची सर्व्हिस राखत दुसरा सेट ७-५ असा जिंकून १-१ने बरोबरी साधली.तिसºया व निर्णायक सेटमध्ये वेस्लीने लाजवाब खेळ केला. त्याने एगोरला कोणतीही संधी न देता प्रारंभीपासून आघाडी घेतली. हा सेट ६-३ असा सहजपणे जिंकून त्याने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

टॅग्स :Tennisटेनिस