शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थ नगरीत उसळला जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 13:48 IST

फटाक्याची आतीष बाजी व गुलालाची उधळन करुन जिजाऊ भक्तांनी आनंदोत्सव साजरा केला.

- काशिनाथ मेहेत्रेसिंदखेड राजा:  जिजाऊ माँ. साहेबांचे जन्मोत्सवा निमित्त  १२ जानेवारी रोजी सुर्योदय समई  मंगलमय वातावरणात सनई चौघड्यांच्या वाद्यात माँ जिजाऊंचे पूजन करण्यात आले. फटाक्याची आतीष बाजी व गुलालाची उधळन करुन जिजाऊ भक्तांनी आनंदोत्सव साजरा केला. जन्मोत्सवासाठी जनसागर उसळला आहे. राष्ट्रमाता जिजाऊ माँ. साहेब क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले दशरात्रौत्सवा निमित्त  ३ जानेवारी पासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते. १२ जानेवारीला येथे जिजाऊ भक्तांची मोठी गर्दी झाली होती. राजवाडा रोषणाईने ऊजळुन निघाला. तर राजवाड्यात सडासमार्जन करुन रांगोळी काढण्यात आली. सुर्योदय समई जाधव कुळातील वंशजानी अभिवादन केले.

त्या नंतर महाराष्ट्र  शासनाचे वतीने कॅबीनेट मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खा. प्रतापराव जाधव, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासह मान्यवरांनी माँ. साहेबांना अभिवादन केले. त्यानंतर जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवासंघ, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्यावतीने अभिवादन करण्यात आले.  ११ जानेवारी पासूनच महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपºयामधुन जिजाऊ भक्तांचे जथ्थे जिजाऊ शिवरायांच्या  घोषणा देत मातृतिर्थ नगरीत दाखल झाले होते. घोषणांनी जिजाऊ नगरी दुमदुमली होती. जिजाऊ भक्त भगवे फेटे बांधुन हातात भगवा ध्वज घेऊन येत आसल्यामुळे नगरी भगवेमय झाली होती.

टॅग्स :Jijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तवSindkhed Rajaसिंदखेड राजाsindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडा