शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जेईई परीक्षेतही बदललेल्या पॅटर्ननुसार होणार परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 04:33 IST

जानेवारी-एप्रिलच्या परीक्षेत बदल : ३ तासांची वेळ असणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून एप्रिल महिन्यात होणाऱ्या दुसºया जेईई मेन्स परीक्षा-२०२० करिता नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. जानेवारीत जेईई मेन्स परीक्षेत उत्कृष्ट गुण न मिळवू शकलेल्या उमेदवारांना एप्रिलमध्ये होणाºया जेईई मेन्स परीक्षेत गुणांमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळेल. जेईई मेन्स परीक्षा एप्रिल महिन्यात ५, ७, ९ आणि ११ एप्रिल, २०२० रोजी होणार असून, ही परीक्षा उत्तीर्ण करणाºया १२वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश मिळू शकेल. मात्र, जानेवारी, २०२० प्रमाणे या परीक्षेतही प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात बदल करण्यात आले आहेत.

बी.आर्क आणि बी. प्लॅनिंगची पात्रता ठरविलेल्या निकषांच्या आधारे आणि संबंधित विषय तज्ज्ञांच्या सल्ल्याने बीई, बी.टेक, बी. आर्क आणि बी. प्लॅनिंगच्या प्रश्नपत्रिकेचे प्रारूप व प्रश्नांच्या संख्येत बदल करण्यात आले असून, यासाठी जॅब (जेईई अपेक्स बॉडी)ची परवानगी घेण्यात आली आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जारी केलेल्या परिपत्रकाप्रमाणे सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा कॉम्प्युटराइज्ड आधारित घेतल्या जाणार आहे.बीई/बीटेकच्या परीक्षांत भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र या ३ विषयांचा समावेश असणार असून, २० मल्टिपल चॉइस प्रश्न तर ५ संख्यात्मक प्रश्नांचा समावेश असेल. संख्यात्मक प्रश्नांसाठी निगेटिव्ह मार्किंग नसले, तरी मल्टिपल चॉइस प्रश्नांसाठी-१ गुण असेल. आर्किटेक्चरच्या परीक्षेत गणित, रेखांकन आणि योग्यता असे ३ भाग असणार असून, ४०० गुणांच्या परीक्षेसाठी ३ तासांची वेळ असेल.अशी असेल गुणांची विभागणीप्लॅनिंगच्या परीक्षेत गणिताच्या भागासाठी २५ प्रश्न, योग्यतेसाठी ५०, तर प्लॅनिंगवर आधारित २५ प्रश्न असणार आहेत. बी.आर्क आणि बी. प्लॅनिंगच्या आधी पार्टच्या टेस्टमध्ये मुख्यत: अ‍ॅनालिटिकल रिजनिंग, मेंटल अ‍ॅबिलिटी, न्यूमेरिकल आणि व्हर्बल यावर प्रश्न विचारण्यात येतील.