शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कणा नसलेले सरकार; महिलांनंतर आता शासनाचे अधिकारीही असुरक्षित- जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 17:47 IST

Jayant Patil vs Maharashtra Government: "याआधी उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात असे प्रकार घडत असल्याचे ऐकले होते"

Jayant Patil vs Maharashtra Government: गेल्या काही दिवसांत राज्यात अनेक विचित्र घटना घडत आहेत. आधी बदलापूरमधील शालेय मुलींवरील अत्याचाराची घटना घडली. त्यानंतर राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या दोन घटनांमुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडत आहेत. तशातच तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या केल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात घडली. या साऱ्या घटनांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला धारेवर धरले. राज्यातील सरकार हे कणा नसलेले सरकार आहे हे सिद्ध होतंय, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

आपल्या ट्विटर हँडलवरून जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. "हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात तलाठी कार्यालयात घुसून तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या राज्यातील महिला, मुली, सामान्य नागरिक तर सुरक्षित नव्हताच पण आता राज्यातील शासनाचे अधिकारीही सुरक्षित नाहीत असे दिसते. अशा बातम्या वाचून आपल्या राज्यात 'कणा नसलेले सरकार' आहे हेच सिद्ध होत आहे. याआधी आम्ही युपी, बिहारला असे प्रकार घडतात असे ऐकत होतो. मात्र आता महाराष्ट्रातही असे प्रकार घडत आहेत हे पाहून वेदना होतात," असे ते म्हणाले.

हिंगोलीच्या वसमतमध्ये नक्की काय घडले?

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष पवार यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संतोष पवार हे तलाठी सज्जात कामकाज सुरू असताना आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. आरोपीने आधी संतोष पवार यांच्या तोंडावर मिरची पूड फेकली. त्यानंतर आरोपीने संतोष पवार यांच्यावर चाकूने हल्ला केला. हा प्रकार बुधवारी (२८ ऑगस्ट) घडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

तलाठी पदावर कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याची अशाप्रकारे निर्घृण हत्या कशी होऊ शकते? आरोपीला पोलिसांचं भय नव्हते का? असे प्रश्न या प्रकारानंतर उपस्थित होत आहेत. या प्रकरणी विविध कलम अंतर्गत आरोपी विरोधात हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. या हत्येनंतर राज्यभर संताप पाहायला मिळात आहे.

 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलHingoliहिंगोलीWomenमहिलाGovernmentसरकार