शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारला झोडपले, जिल्ह्यात रिपरिप सुरुच

By admin | Updated: July 15, 2017 02:58 IST

शहरातील आकार प्लाझा इमारती समोरील स्टॅण्डच्या शेजारच्या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप येऊन परिसरातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : तालुक्यात बुधवारी रात्रीपासून पावसाची संततधार असून शहरातील आकार प्लाझा इमारती समोरील स्टॅण्डच्या शेजारच्या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप येऊन परिसरातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जिमखाना हॉल समोरील, जव्हारकर मिल समोरील रस्त्यावर एक ते दिड फूट पाणी भरून तेथील विक्रेत्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शहरातील जिमखाना हॉल समोरील बिल्डींग मटेरीयल स्पलायचे दोन दुकाने व त्यांच्या बाजुला टायर व इनव्हर्टरचे दुकान असून बिल्डींग मटेरीयल मधील जुम्मानी व भुवर यांच्या दुकानात पाणी शिरल्यामुळे सिमेंटच्या गोणी भिजून मोठे नुकसान झाले. तर टायर व इनव्हर्टरच्या दुकानात पाणी शिरल्यामुळे त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच आकर प्लाझा व परिसरातील दुकानांतही मोठ्याप्रमाणात कपड्यांच्या व जनरल स्टोर्सच्या दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने सामानांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील अनियोजीत गटारांचे बांधकाम व त्यांची पावसापुर्वी साफसफाई न झाल्याने तुंबलेल्या गटारीमुळेच रस्त्यांवर पाणी साचून नुकसान झाल्यामुळे नगर परिषदेने झालेल्या नुकसानाची भरपाई करावी अशी मागणी इमरान जुम्मानी यांनी केली आहे. पावसामुळे काहीकाळ वाहतूकीवर परिणाम झाला होता.>पावसामुळे शेतीच्या कामांना सुरुवातविकमगड: तालुक्यात गेल्या आठवडयापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे या भागातील शेतकऱ्याची भात लावण्याची कामे खोळबली होती. तालुक्यात ७,५५८ हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते. भात हे मुख्य पिक असून या वरच या भागातील आर्थिक उत्पन्न अवलूबन आहे. या अगोदर काही शेतकऱ्याची भात लावणी झाली होती ती पिके सुकू लागली होती काही शेतकऱ्यानी तरे विहिरपंप लाऊन भात लावणी सूरू केली परतू बुधवार पासून पुन्हा पावसाला चांगली सुरवात झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला असून पुन्हा शेतीची कामे सुरू झाली आहेत.गेले काही दिवस पावसाने तालुक्याातील शेतकऱ्यांना हुलकावणी दिल्यामुळे ते चांगलेच धास्तावले होते. मात्र आता पुन्हा तालुक्यात सर्वत्र शेतीच्या कामांना सुरवात झाली आहे. सलग पाऊस. झाल्यास यंदा भाताचे पीक चांगले येईल, असा अंदाज शेतकरी रणधिर पाटील यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केला.>मोखाड्यात सर्वाधिक नोंदपालघर: गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने दमदार सुरु वात केली असून यामुळे बळीराजाची चिंता दूर होणार असे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सर्वाधिक पावसाची नोंद मोखाडा तालुक्यात १००.५ मिमी इतकी नोंद झाली आहे. त्याखालोखाल जव्हार ९४.० मिमी तर विक्र मगड तालुक्यात ६९.० मिमी, वाडा तालुक्यात ६८.३ मिमी, तलासरी ४३.१ मिमी,डहाणू तालुक्यात ३५.० मिमी, पालघर तालुक्यात १२.८ तर सर्वात कमी पाऊस वसई तालुक्यात झाला असून आजची तालुक्यातील पावसाची नोंद ४.२ अशी आहे.जिल्ह्यातील धरणांचा आजचा पाणीसाठा समाधान कारक असून धामणी धारण-प्रकल्पीय संकिल्पत क्षमता २७६.३५ दलघमी असून आजचा पाणीसाठा १९७.३७ दलघमी, कवडास-प्रकल्पीय संकिल्पत क्षमता ९.९६ दलघमी तर, आजचा पाणीसाठा ९.९६ दलघमी तर वांद्री -प्रकल्पीय संकिल्पत पाणीसाठा ३५.९४ दलघमी असून आजचा पाणीसाठा १६.२७ दलघमी आहे.>वसईत आभाळमायेला फुटला पाझरपारोळ : वसई भात लावणीच्या ऐन हंगामात आभाळमाया पातळ झाल्याने अनेक दिवसा पासून या परिसरात उन्ह सावली चा खेळ सुरु होता. तसेच भात लावणी हवा तसा पाऊस पडत असल्याने या भागात लावणीची कामे खोळंबली होती. पाऊस पडत नसल्याने लावणीचा हंगाम निघून जातो की काय अशी चिंता बळीराजाला लागली असतानाच आभाळ मायेने आपला पान्हा सोडल्यांने पुन्हा एकदा वसई भात लावणी च्या कामांना वेग आला आहे. गुरुवारी रात्रीपासूनच पावसाची संततधार असल्याने तालुक्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.या वर्षी पावसाची सरासरी जास्त असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला तर पंचाग कर्त्यांनी नक्षत्र व त्यांचे वाहन या वर पावसाचा अंदाज बांधला. पण त्या अंदाजाला पावसाने खोटे ठरवले. दरम्यान, बळीराजाने मात्र अंदाजाच्या भरोशावर महागडी भात बियाणी पेरली आहेत. यावर्षी वेळोवेळी पावसाने दडी मारल्याने आधी पेरण्या नंतर आता भर भात लावणी च्या हंगामातही पाऊस सुट्टीवर गेल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. पण पुनर्वसूच्या कोल्हाने लबाडी न करता चांगल्या पावसाच दान दिल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे.