शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या शब्दाचा मान राखला, शरद पवारांच्या निकटवर्तीय मित्राने व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 10:42 IST

शरद पवार यांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्या. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल.

बारामती (जि. पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर बारामतीकरांमध्ये दाटलेली अस्वस्थता दूर होण्यास सुरुवात झाली. पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ‘अध्यक्षां’च्या निर्णयाचे उत्साहात स्वागत केले आहे.  

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील म्हणाले की, शरद पवार यांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्या. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल. तर आमच्या शब्दाचा मान शरद पवार यांनी राखला अशी भावना पवारांचे १९६७ च्या निवडणुकीपासूनचे निकटचे मित्र असणारे माजी नगराध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष वनिता बनकर म्हणाल्या, साहेबांचे मार्गदर्शन आणि नेतृत्वाची केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर सर्वांनाच गरज आहे.  राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष आणि पवार यांचे जुने सहकारी सुभाष ढोले यांनी सांगितले की, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता शरद पवार यांच्याशिवाय अन्य कोणाच्यातही नाही. त्यांच्या निर्णयाचा आम्हा सर्वांना आनंद आहे.

...या माणसाचा रुबाब आजही कायम शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर समर्थक, काही नेते राजीनामा मागे घेण्यासाठी अडून बसले. देशभरातून राहुल गांधी, स्टॅलिन, ममतांसारख्या नेत्यांचे फोन येऊन गेले. सत्ता असो, वा नसो. या माणसाचा रुबाब आजही कायम आहे. ही पवार यांचे राजकीय महत्त्व अधोरेखित करणारी पोस्ट सोशल मीडियावर सर्वाधिक ‘व्हायरल’ झाल्याचे चित्र होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस