शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Jammu & Kashmir: 'या' मराठमोळ्या व्यक्तीनं कलम ३७०ला दिलं होतं सर्वोच्च न्यायालयात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 06:32 IST

वी द सिटिझन; दिवंगत संदीप कुलकर्णी यांच्या लढ्याला यश

- धनंजय वाखारे नाशिक : काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलमाला थेट सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देत वाचा फोडणारी व्यक्ती मूळ नाशिककर होती. नाशिकच्या संदीप कुलकर्णी यांनी नवी दिल्लीत असताना स्थापन केलेल्या ‘वी द सिटिझन’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत न्यायालयात जनहित याचिका दाखल करत सर्वप्रथम या लढ्याला तोंड फोडले. मोदी सरकारने सोमवारी घेतलेल्या या निर्णयामुळे कुलकर्णी यांच्या पश्चात त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू ठेवलेल्या लढ्याला यश आले आहे.ऑगस्ट २०१४ मध्ये सर्वप्रथम ‘वी द सिटिझन’ या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. संस्थेच्या संस्थापकांपैकी एक सदस्य होते नाशिकचे संदीप रमेश कुलकर्णी. कुलकर्णी यांच्यासमवेत प्रख्यात पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनीदेखील याचिकाकर्ता म्हणून सहभाग नोंदविला. डिसेंबर २०१६ मध्ये संदीप कुलकर्णी यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पुष्पेंद्र व त्यांच्या सहकाऱ्यांनी कुलकर्णी यांनी सुरू केलेली लढाई पुढे चालू ठेवली. आता मोदी सरकारने दोन्ही कलम हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर एका नाशिककराने उभारलेल्या लढाईला यश आल्याची भावना बोलून दाखविली जात आहे.संदीप कुलकर्णी या मूळ नाशिककराने या वादग्रस्त कलमांविरुद्ध आवाज उठविला होता. ही कलमे हटवत मोदी सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कुलकर्णी यांना खऱ्या अर्थाने ती श्रद्धांजलीच म्हणावी लागेल. संदीप हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आमच्याच शाखेत कार्यरत होता.- प्रकाश दीक्षित, स्वयंसेवक, आरएसएस

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370