शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जालन्याच्या किशोरने फडकावला जागतिक पोलीस स्पर्धेत तिरंगा, शरीरसौष्ठव स्पर्धेत जिंकले रौप्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 10:23 IST

किशोर डांगे या शरीरसौष्ठवपटूने नुकत्याच झालेल्या जागतिक पोलीस स्पर्धेत तिरंगा फडकावताना रौप्यपदक जिंकण्याचा भीमपराक्रम केला.

बाबासाहेब म्हस्के

जालना, दि. 20  : किशोर डांगे या शरीरसौष्ठवपटूने नुकत्याच झालेल्या जागतिक पोलीस स्पर्धेत तिरंगा फडकावताना रौप्यपदक जिंकण्याचा भीमपराक्रम केला. लॉस एंजिल्स येथे झालेल्या या स्पर्धेत जालना पोलीस दलात कार्यरत असणा-या किशोर डांगे याने हे रौप्यपदक ३४ वर्षांखालील १00 किलो वजन गटात जिंकले. मलेशियाच्या खेळाडूने सुवर्ण तर अमेरिकेने कास्यपदक पटकावले.जागतिक पोलीस स्पर्धेतील किशोरचे हे दुसरे पदक आहे. याआधी त्याने २0१३ मध्ये गोल्डन कामगिरी केली होती तसेच २0११ मध्ये त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. दुबई क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धेत त्याने रौप्य, तर सौदीमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. महाराष्ट्र श्री, मराठवाडा श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत विविध पदके जिंकली आहेत. जागतिक पोलीस स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर त्याचे शनिवारी जालन्यात आगमन झाले. यावेळी लोकमतशी बोलताना शरीरसौष्ठव स्पर्धेतील सहभाग आणि या क्षेत्रातील संघर्षाबद्दल त्याने अनुभव कथन केले.

तो म्हणाला, जागतिक पोलीस स्पर्धेत निवड झाल्यानंतर देशासाठी सुवर्णपदक मिळविण्याचे ध्येय होते; पण रौप्य पदावर समाधान मानावे लागले असले तरी भविष्यात देशासाठी विविध पदके मिळविण्याचा आपला प्रयत्न राहील. शरीरसौष्ठव स्पर्धांत सहभागी होण्यासाठी सातत्य आणि आर्थिक तजवीज महत्त्वाची असते. व्यायामात सातत्य ठेवण्यात यश आले असले तरी खुराकसाठी आर्थिक चणचण भासते, अशी खंत त्याने बोलून दाखविली. आतापर्यंत अनेकांनी मदत केली आहे. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनीही मोलाची मदत केल्याचे त्याने आवर्जून सांगितले.

जालना शहरात विजयी मिरवणूककिशोर शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास तपोवन एक्स्प्रेसने जालना स्थानकावर पोहोचला. फेटा बांधून किशोरची फूल व तिरंगी झेंड्यांनी सजविलेल्या लाल रंगाच्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी आतषबाजी करण्यात आली. गांधीचमन, मस्तगड, सुभाष चौक, मामा चौक, फुलबाजार, शिवाजी पुतळा, बडी सडक मार्गे काढलेल्या मिरवणुकीचा सायंकाळी सात वाजता किशोरच्या कन्हैयानगरातील घराजवळ समारोप करण्यात आला.

टॅग्स :Policeपोलिस