शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

जळगाव : संविधान मेळाव्यापूर्वीच ४१ जणांना अटक, लोकशाही हक्कांवर गदा आणल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 03:12 IST

पोलिसांची परवानगी नसताना रविवारी दुपारी येथे आयोजित संविधान जागर मेळावा घेण्याासाठी आलेल्या ४१ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लोकशाहीवादी नागरिक मंचतर्फे हा मेळावा घेण्यात येणार होता.

जळगाव : पोलिसांची परवानगी नसताना रविवारी दुपारी येथे आयोजित संविधान जागर मेळावा घेण्याासाठी आलेल्या ४१ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ लोकशाहीवादी नागरिक मंचतर्फे हा मेळावा घेण्यात येणार होता. सरकारने लोकशाही हक्कांवर गदा आणल्याचा आरोप आंदोलकांनी केला.सुरुवातीला नूतन मराठा महाविद्यालयात गुजरातमधील दलित नेते व आमदार जिग्नेश मेवानी यांच्या मुख्य उपस्थितीत हा मेळावा होणार होता. मात्र कोरेगाव-भीमा येथील हल्ल्याच्या घटनेनंतर राज्यात हिंसक प्रतिक्रिया उमटली. त्यानंतर मेवानी यांच्या सभेला सध्या राज्यात कोठेही परवानगी न देण्याचा निर्णय पोलीस महासंचालकांनी घेतला आहे.कोल्हापूरमध्ये तोडफोड; १८० जणांना अटककोल्हापूर : कोरेगाव भीमा येथील हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदमध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी रविवारी येथे आणखी १९ जणांना अटक करण्यात आली. तीन दिवसांत १८० आंदोलकांना अटक झाली आहे. पोलिसांनी सर्वांची छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सीसीटीव्ही फुटेजवरून तोडफोड करणाºया आंदोलकांना पकडले जात आहे.कन्हैया कुमारच्या उपस्थितीत परिषद-पुणे : दलित महासंघाच्यावतीने जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याच्या उपस्थितीत २८ जानेवारी रोजी ‘सावधान परिषदे’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकारांना दिली. भीमा-कोरेगाव येथे दोन गटांत उद्भवलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मातंग समाजातील विविध संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. धर्मांध शक्तींपासून दलित समाजाला जागृत करण्यासाठी सावधान परिषदेचे आयोजन केल्याचे सकटे यांनी सांगितले. या परिषदेत लहुजी संघर्ष सेना, लहुजी महासंघ, दलित संघर्ष समिती, आ.ल.व.सा.फांऊडेशन, अखिल भारतीय बहुजन सेना, लहुजी स्मारक समिती संगमवाडी, दलित विकास आघाडीसह विविध संघटना भाग घेणार आहेत.प्रकाश आंबेडकरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी-सांगली : कोरेगाव-भीमा येथे आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या हल्ल्यानंतर पुकारलेल्या ‘बंद’ला हिंसक वळण लागून त्यात एक-दोघांचा बळी गेल्याचा दावा शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी केला आहे. त्याप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. संभाजीराव भिडे यांच्याविरुद्धचे गुन्हे शासनाने सन्मानपूर्वक मागे घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.सरकार हमसे डरती है...पोलिसांनी धरपकड करताच, ‘सरकार हमसे डरती है, पुलीस को आगे करती है’ या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. अटक झालेल्यांमध्ये प्रा. शेखर सोनाळकर, वासंती दीघे, गायत्री सोनवणे, मीराबाई सोनवणे, प्रतिभा शिरसाठ आदींचा समावेश आहे.कोरेगाव भीमा हिंसाचारामागे अदृश्य लोक - उद्धव ठाकरेमुंबई : अदृश्य लोक येतात आणि जातीपातीचे राजकारण करतात. जातीपातीचे राजकारण करत जो कोणी स्वत:ची पोळी भाजून घेणार असतील त्यांना शिवसेना सोडणार नाही. कोरेगाव-भीमा घडविणा-यांनी हिंमत असेल तर पुढे येऊन सांगावे असे आव्हान देतानाच राममंदिर बांधण्याची भाषा करणारे बाबरी मस्जिद पाडताना पळून का गेले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केला. चेंबूर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराच्या उद्घाटनप्रसंगी ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर सडकून टीका केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव