शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूर प्रकल्प राज्याला उद्ध्वस्त करणार!

By admin | Updated: April 30, 2015 01:53 IST

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राज्याला उद्ध्वस्त करेल, असा आरोप जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी जनहक्क सेवा समितीने केला.

मुंबई : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राज्याला उद्ध्वस्त करेल, असा आरोप जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी जनहक्क सेवा समितीने केला. आपला दावा स्पष्ट करण्यासाठी समितीने काही पुरावेही समोर ठेवले. समितीने जैतापूर प्रकल्पाविरोधात मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रपरिषद घेतली. त्यात समितीचे निमंत्रक, पर्यावरण तज्ज्ञ गिरीश राऊत म्हणाले, की माहिती अधिकाराखाली अणुऊर्जा खात्याने समितीला काही महत्त्वपूर्ण अहवाल दिले आहेत. त्यात १९७२ सालच्या मार्गदर्शक सूचना देणाऱ्या चक्रवर्ती समितीचा अहवाल आहे. या अहवालात भूभ्रंशापासून ५ किलोमीटरच्या क्षेत्रात अणुभट्टी बांधता येणार नाही, अशी सूचना करण्यात आली आहे. मात्र २००२ सालच्या चतुर्वेदी समितीच्या स्थान निश्चिती संबंधी अहवालात याउलट परिस्थिती दिसते. चतुर्वेदी समितीच्या अहवालानुसार जेथे अणुभट्ट्या बांधल्या जाणार आहेत त्या माडबनच्या सड्यातूनच भूभ्रंश जात असल्याचे निदर्शनास येते. प्रकल्पाच्या स्थानापासून ५ किलोमीटर अंतराच्या आत आणखी दोन भूभ्रंश आहेत, असे ही कागदपत्रे सांगतात.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असताना या प्रकल्पविरोधी मत प्रदर्शित केल्याची माहिती समितीचे कार्यकर्ते सत्यजित चव्हाण यांनी दिली. २०१३ साली झालेल्या चर्चेत खुद्द फडणवीस यांनी अमेरिकेतील सिनेट कमिटीच्या अध्यक्षांची भेट घेतल्याचे सांगितले होते. त्यात फडणवीस यांनी अध्यक्षांना अमेरिकेत १९७९ सालापासून अणुभट्टी बंद असल्याचे कारण विचारले होते. त्यावर पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या अणुऊर्जा प्रकल्प देशाला घातक असल्याचे अध्यक्षांनी सांगितले होते. त्यामुळे विरोधी पक्षात असताना प्रकल्पविरोधी वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शांत राहणे वेगळाच संदेश देते, असे ते म्हणाले.डॉ. काकोडकरांचे वक्तव्य दिशाभूल करणारे ?जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला भूकंपाचे धक्के बसणार नाहीत, हे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे आहे, असा आरोपही समितीने केला. गेल्या २० वर्षांमध्ये प्रकल्पस्थळाला मध्यम व मोठ्या स्वरूपाचे ९३ धक्के बसल्याचा दावा समिती करते. ही माहिती अणुऊर्जा महामंडळाकडून (एनपीसीआयएल) मिळाल्याचे समितीने सांगितले. पश्चिम महाराष्ट्रालाही प्रकल्पाचा धोका : अणुऊर्जा प्रकल्पाचा धोका केवळ कोकणवासीयांना बसेल हा गैरसमज आहे. कोणताही अपघात झाल्यास अणुऊर्जा प्रकल्पापासून १०० कि़मी़ त्रिजेत येणाऱ्या परिसराला त्याचा तीव्र फटका बसेल. त्यात रत्नागिरी व सिंधुदुर्गसह कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांनाही झळ बसेल, असे समितीने सांगितले.