शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

जय मल्हार... 'लोकमत'चे फोटोग्राफर प्रशांत खरोटे यांचा 'विकिपीडिया'कडून सन्मान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 19:48 IST

'लोकमत'नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांचा 'विकिपीडिया'या जागतिक माहिती स्रोत संकेतस्थळाकडून मुंबई येथील लोकमत मुख्य कार्यालयात सत्कार करण्यात आला.

 नाशिक  - 'लोकमत'नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांचा 'विकिपीडिया'या जागतिक माहिती स्रोत संकेतस्थळाकडून मुंबई येथील लोकमत मुख्य कार्यालयात सत्कार करण्यात आला.

'विकिपीडिया'च्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खरोटे यांनी टिपलेल्या जेजुरीमधील चंपाषष्ठीच्या ‘खंडोबा उत्सव’ या छायाचित्राने प्रथम क्रमांक पटकाविला होता. या स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय फेरीमध्ये जगभरातून सुमारे दोन लाख ४६ हजार १०१ छायाचित्रे प्राप्त झाली होती. या सर्व छायाचित्रांमध्ये भारताच्या टॉप टेनमधील अव्वलस्थानी राहिलेले 'खंडोबा उत्सव' छायाचित्राने बाजी मारली आणि प्रथम क्रमांक पटकाविला. त्यामुळे 2012 सालानंतर आंतरराष्ट्रीय ‘विकीलव्ह मॉन्यूमेंट्स' स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकला. आंतरराष्ट्रीय पातळीवर विकिपीडियाच्या स्पर्धेत भारतीय छायाचित्राला प्रथम क्रमांक मिळण्याची ही पहिली वेळ ठरली, असे विकिपीडियाचे भारतीय चॅपटर कौंसिल सदस्य सुयश द्विवेदी यांनी सांगितले. वरळी येथील लोकमत कार्यालयात त्यांच्या हस्ते प्रशांत खरोटे यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस - कॅनन 5डी-मार्क-4 कॅमेरा आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 'लोकमत'च्या संपादकीय आणि व्यवस्थापकीय विभागातील वरिष्ठही या पुरस्कार वितरणाला उपस्थित होते.

 यावेळी द्विवेदी म्हणाले, खरोटे यांच्या छायाचित्राला आंतरराष्ट्रीय फेरीत मिळालेला प्रथम क्रमांक हा त्यांच्यासह संपूर्ण भारताचा सन्मान आहे. यापूर्वी असा प्रथम क्रमांक भारतीय छायाचित्राला मिळू शकलेला नाही. ही स्पर्धा जागतिक पातळीवर आयोजित करण्यात आलेली सर्वात मोठी छायाचित्र स्पर्धा होती. त्यामुळे भारतीय विकिपीडियासाठी गौरवाची बाब आहे. त्यांनी टिपलेला उत्सव हा आगळावेगळा असून हे छायाचित्र उत्सवामागील एक कथा सांगून जाते. यावेळी त्यांनी विकिपीडियाबाबतही माहिती दिली.दरम्यान, यावेळी केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :Lokmatलोकमतnewsबातम्या