शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
3
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
4
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
5
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
6
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
7
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
8
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
9
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
10
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
11
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
12
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
13
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
14
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
15
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
16
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
17
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
18
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
19
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
20
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार

पूरग्रस्त स्थितीतून बाहेर यायला वेळ लागेल, भंपकपणा सोडून निवडणूका पुढे ढकला : ना. धों. महानोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 11:58 IST

सध्या सत्ता तुमचीच आहे. मग, निवडणूक पुढे ढकलली तर कोणाचे काय जाणार आहे..

ठळक मुद्देनारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार प्रदान‘चार कविता कमी लिहिल्या तरी चालेल, पण सुर्वेसारखे जगण्याचा प्रयत्न करेन.

पुणे : पूरग्रस्त परिस्थितीतून बाहेर पडून सगळे नव्याने उभे करायला किमान पाच-सहा वर्षे लागतील. अशावेळी भंपकपणा करून उपयोग नाही. कोटींचे आकडे बाजूला ठेवून प्रत्यक्ष काम करावे लागणार आहे. सध्या सत्ता तुमचीच आहे. मग, निवडणूक पुढे ढकलली तर कोणाचे काय जाणार आहे, असा सवाल उपस्थित करत ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर यांनी सरकारवर निशाणा साधला. निवडणुकीची आचारसंहिता लागली की कामात अडचणी येतात. त्यामुळे निवडणुका किमान दोन-तीन महिने पुढे ढकला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे आयोजित कार्यक्रमात रविवारी एस.एम.जोशी सभागृह येथे ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे स्मृतीदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले उपस्थित होते.निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांना नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार, ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांना नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाटय परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांना नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, तसेच सूर्यदत्ता ग्रूप ऑफ इन्स्टिटयूटचे डॉ. संजय चोरडिया यांचा विशेष सन्मान करण्यात आला.महानोर म्हणाले, ‘चार कविता कमी लिहिल्या तरी चालेल, पण सुर्वेसारखे जगण्याचा प्रयत्न करेन. १९५६ संयुक्त महाराष्ट्राची निवडणुकीच्या दरम्यान शाहीर अमर शेख यांच्या माध्यमातून मला नारायण सुर्वे पहिल्यांदा भेटले. त्या निवडणुकीतील एक पान अमर शेख आणि नारायण सुर्वे यांचे आहे. सुर्वेंनी जगण्याचा, रोजीरोटीचा प्रश्न कवितेतून मांडला. घाम गाळणा-या दु:खी माणसाचा हुंकार त्यांनी ठोसपणे पहिल्यांदा मांडला.’ उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन इटकर यांनी प्रास्ताविक केले. --------------काय म्हणाले महानोर?- १९५६ च्या संयुक्त महाराष्ट्राच्या निवणुकीमध्ये सभा, संमेलने रंगत होती, दिग्गजांची उपस्थिती असायची. एका सभेला जवाहरलाल नेहरु स्वत: उपस्थित होते. त्यांनी रशिया, चीनसंबंधी आंतरराष्ट्रीय प्रश्न, भाक्रानांगल याबाबत भाष्य केले. त्यावेळी समाजवादी पक्षातर्फे कोणी निवडणूक लढवायला तयार नव्हते. एका तरुणाला काँग्रेसविरोधात उभे करण्यात आले. शाहीर अमर शेख यांनी सुर्वेंच्या कवितेच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचारात वास्तव मांडले. त्यावेळी भाकरी महत्वाची की भाक्रानांगल, असा सवाल उपस्थित करण्यात आला.- मला उजवा-डावा असा भेद समजतच नाही. तुकारामालाही त्यातील काही समजत नव्हते. त्यांनी केवळ प्रेमाची शिकवण दिली. समाजाच्या भल्याचा विचार केला. डावे-उजवे असे मतभेद नक्की असतील. पण देशात इतिहास घडवणारा माणूस म्हणून नेहरुंचा मोठेपणा विसरता येणार नाही. राजकारणात तारतम्य बाळगून कसे चालले पाहिजे, हे त्या काळातील लोकांकडून आजच्या राजकारण्यांनी समजून घेतले पाहिज.े- भ्रष्टाचार ना करेंगे, ना करने देंगे हे कोणत्या आत्मविश्वासाने बोलले जाते? महाराष्ट्र आणि देशात अजूनही भ्रष्टाचार राजरोसपणे सुरू आहे.- काँग्रेसच्या विरोधात उभे राहायला तेव्हा माणसेच मिळत नव्हती. परिस्थिती कशी बदलते, ते आता कळते आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.- राजकारण्यांना लाजवेल असे राजकारण आमचे साहित्यिक करतात. निवडणुकीत एकगठ्ठा मते, मतांची पळवापळवी हे लाजिरवाणे होते. कविता, साहित्यासाठी आयुष्य वेचलेले दिग्गजही संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीत पडले. यातून काय साध्य झाले? साहित्य संमेलनाबद्दल न बोललेलेच बरे.

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारfloodपूरElectionनिवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस