शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खाण्यायोग्य नसलेल्या बर्फात आता मिसळला जाणार निळा रंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 20:26 IST

पाण्यापासून तयार केलेला बर्फ अनेकदा खाद्यपदार्थात वापरला जातो. तो शरीरासाठी घातक असल्याचं निदर्शनास आलं आहे.

नवी दिल्ली- पाण्यापासून तयार केलेला बर्फ अनेकदा खाद्यपदार्थात वापरला जातो. तो शरीरासाठी घातक असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर खाण्यास योग्य नसलेला बर्फ ओळखता यावा, यासाठी बर्फात निळसर रंग टाकण्याबाबतचे निर्देश अन्न व औषध प्रशासनानं दिले आहेत. गेल्या अनेक काळापासून प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी मंजुरी दिली असून, त्याची प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. 

खाण्यात वापरण्यात येणारा बर्फ शरीरासाठी अपायकारक असल्यानं आरोग्याला धोका संभवू शकतो. ही गोष्ट लक्षात घेऊन अयोग्य बर्फ ओळखण्यासाठीच बर्फात निळसर रंग टाकावा, असे आदेश देण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश अन्न सुरक्षा आयुक्तांना दिल्याची माहिती बापट यांनी या निवेदनाद्वारे दिली. बर्फाचा वापर खाद्यपदार्थांमध्ये तसेच उद्योगासाठीही केला जातो. मात्र औद्योगिक कारणास्तव वापरण्यात येणारा, पिण्यास अयोग्य असलेल्या पाण्यापासून तयार केलेला बर्फ अनेकदा खाद्यपदार्थातही वापरला जात असल्याचंही अनेकदा समोर आलं आहे.