शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

आता बारावीपर्यंतचेही शिक्षण मोफत मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 07:07 IST

शिक्षणहक्क कायद्याचा विस्तार करून ३ ते १८ वर्षे वयोगटांतील सर्वांना मोफत, सक्तीचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरणात करण्यात आली.

- धर्मराज हल्लाळेलातूर  - शिक्षणहक्क कायद्याचा विस्तार करून ३ ते १८ वर्षे वयोगटांतील सर्वांना मोफत, सक्तीचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरणात करण्यात आली. त्यामुळे पूर्व प्राथमिकबरोबरच इयत्ता नववी ते बारावीचे शिक्षणही आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांसाठी मोफत मिळू शकेल़ मात्र, त्याच्या अंमलबजावणीची कालमर्यादा २०३० पर्यंत असल्याने प्रस्तावित धोरण तूर्त बिरबलाच्या खिचडीसारखे आहे. सद्य:स्थितीत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत आहे़ज्यामध्ये सदर कायद्यांतर्गत खासगी शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क शासनाकडून संबंधित संस्थांना दिले जाते. तसेच अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा एकाच परिसरात स्थापित करावी़ यासाठी स्वतंत्र योजना आखण्यात येणार असून, महिला बालकल्याणकडे असणारी अंगणवाडी शिक्षण विभागाला जोडण्याची शिफारसही या धोरणात करण्यात आली आहे. शोधक वृत्ती वाढावी यासाठी अभ्यासक्रम बदलावा पहिल्या टप्प्यात २०२५ पर्यंत ३ ते ६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत सुरक्षित उच्च गुणात्मक शिक्षण देण्याचा विचार मांडला आहे़ साधारणत: मेंदूचा ८५ टक्के विकास वयाच्या सहाव्या वर्षांपर्यंत होतो. त्यामुळे बाल्यावस्थेतील शिक्षणाचे महत्त्व धोरणात अधोरेखित केले आहे़ त्यासाठी खेळ आधारित शोधक वृत्ती वाढविणारा अभ्यासक्रम एनसीईआरटीने तयार करावा, असेही सुचविण्यात आले आहे़३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक नेमावा३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक नेमावा तसेच शिक्षकांची रिक्त पदे लवकर भरावीत, अशी शिफारसही राष्ट्रीय शिक्षण धोरणात करण्यात आली आहे़ प्रत्यक्षात आजही इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत ३० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक तर इयत्ता सहावी ते आठवी ३५ विद्यार्थ्यांमागे १, इयत्ता नववी ते दहावी ४० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक नेमण्याचे धोरण आहे़ मात्र लाखो विद्यार्थी वाढले तरी पाच वर्षांपूर्वीच्या मंजूर पदांइतकेच शिक्षक आज आहेत़असे करण्याचे कारण काय?शिक्षण हक्क कायद्यामुळे इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या ९५ टक्क्यांवर गेली आहे, परंतु दहावीनंतर गळतीचे प्रमाण आजही धक्कादायक असून, इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्गात २०१६-१७ साली प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या ५१ टक्के होती़ त्यामुळेच नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत, अनिवार्य आणि गुणवत्तापूर्ण देण्यासाठी कायद्याचा विस्तार करावा, अशी शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरणात केली आहे़

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा