शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सुशीलकुमार शिंदे यांच्या सत्काराचा कार्यक्रम कोणी करायचा हेच अस्पष्ट

By admin | Updated: July 21, 2016 20:50 IST

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून करण्यात येणारा सत्कार कोणी करायचा हे स्पष्ट

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. २१ : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून करण्यात येणारा सत्कार कोणी करायचा हे स्पष्ट व्हावे म्हणून महापौर सुशीला आबुटे यांना पत्र दिल्याचा खुलासा आयुक्त विजयकुमार काळम यांनी गुरूवारी केला. या कार्यक्रमाला राष्ट्रपती येणार म्हणून महापालिकेकडे कसलेच पत्र आलेले नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महापालिकेतर्फे मानपत्र देऊन सत्कार करण्याचा सभेने यापूर्वी ठराव केला होता. त्यादृष्टीकोनातून तयारी सुरू झाली आहे. पार्क स्टेडियमवर ४ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम करण्याचे नियोजन आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याहस्ते हा कार्यक्रम होणार असल्याने महापालिकेत तयारीबाबत दोन बैठका झाल्या. जुलै महिन्याच्या सभेकडे या कार्यक्रमासाठी दीड कोटी खर्चाची तरतूद करण्याचा विषय प्रशासनाने पाठविला आहे. यावर माहिती अधिकार मंचाचे विद्याधर दोशी यांनी पत्राद्वारे हरकत घेतली आहे.

या विषयाच्या अनुषंगाने गुरूवारी भापजचे शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी, विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त काळम यांची भेट घेतली. भाजपचे शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांच्या सत्काराचा कार्यक्रम कोणी आयोजित केला, कार्यक्रम पक्षाचा की महापालिकेचा, महापालिकेचा असेल तर सत्काराबाबत शिंदे यांच्याशी प्रशासनाने बोलणी केली आहेत का. कार्यक्रमासाठी महापालिकेच्या तिजोरीतून दीड कोटी खर्च करण्यापेक्षा यानिमित्ताने गौरव विशेषांक काढून त्याच्यातून मिळणाऱ्या जाहिरात व नगरसेवकांच्या मदतीतून हुतात्मा स्मृती मंदिरात हा कार्यक्रम व्हावा अशी भूमिका मांडली.

नगरसेविका रोहिणी तडवळकर, नगरसेवक जगदीश पाटील, काळे, विक्रम देशमुख यांनी शिंदे यांच्या सत्काराला आमचा विरोध नाही. मनपाने ठरावच केलेला आहे. पण मनपाची आर्थिक स्थिती पाहता सत्कारावर इतकी उधळपट्टी नको. जनता आम्हाला जाब विचारणार आहे असे म्हणणे मांडले.

त्यावर आयुक्त काळम यांनी राष्ट्रपतींच्या दौऱ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक पत्र आले आल्याने आम्ही तयारी सुरू केली आहे. सत्काराबाबत माझ्याकडे कोणतीच अधिकृत माहिती नाही. अमृत महोत्सव सत्कार समितीचे अध्यक्ष डी. वाय. पाटील यांना राष्ट्रपतींच्या दौऱ्याबाबत आलेले पत्र महापौरांनी माझ्याकडे दिले आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रपती दौऱ्यासाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद असावी म्हणून सभेकडे विषय दिला आहे. सर्वांनी चर्चा करून याबाबत निर्णय घ्यावा. या कार्यक्रमाच्या खर्चाबाबत माहितीच्या अधिकारात आलेल्या पत्रात मी हीच भूमिका मांडणार आहे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अमृत महोत्सवानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा तिसऱ्यांदा मानपत्र देऊन सत्कार करण्याचा भावनिक मुद्दा आहे. मनपाची स्थिती नाजूक आहे. दरमहा जप्ती येत आहे. हा सत्कार कोणी करायचा हेच प्रशासनाकडे आलेले नाही.विजयकुमार काळम, आयुक्त