शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

तब्बल पन्नास दिवसांनी लागला खुनाचा छडा

By admin | Updated: May 30, 2016 01:33 IST

कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील शीतल नर्सरीमधील लॉनवर ६ एप्रिल रोजी मृतावस्थेत आढळून आलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली

लोणी काळभोर : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील शीतल नर्सरीमधील लॉनवर ६ एप्रिल रोजी मृतावस्थेत आढळून आलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली आहे. गुन्हे शोध पथकाला त्याच्या खुन्यास तब्बल पन्नास दिवसांच्या अथक तपासानंतर पकडण्यात यश आले आहे. हा खून मद्य पिण्याच्या कारणांवरून झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.शीतल नर्सरीमध्ये शिवाजी बापूराव जवादे (वय ४५, रा. पिंपळे गुरव, सांगवी, पुणे) यांचा खून केल्याप्रकरणी मच्छिंद्र विष्णू गर्जे (वय २७, रा. बावी, ता. आष्टी, जि. बीड) यास अटक केली आहे. हा प्रकार ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रणजितसिंह परदेशी यांनी फिर्याद दिली होती. ते लोणी काळभोर पोलीस ठाण्यात असताना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शीतल नर्सरीचे मालक भालचंद्र महादेव टिळेकर यांनी याबाबत माहिती दिली होती. परदेशी यांनी पथकासमवेत घटनास्थळी जाऊन पाहणी करून माहिती घेतली असता नर्सरीमध्ये कामास असलेला कामगार विठ्ठल ऊर्फ तानाजी पिसे यास हा इसम ११ वाजण्याच्या सुमारास लॉनवर मयत स्थितीत आढळून आला. त्यामुळे खून करणाऱ्या इसमाने कसलाही धागादोरा मागे न सोडल्याने याचा छडा लावून खुन्यापर्यंत पोहोचणे जिकिरीचे काम होते. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर, पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी याप्रकरणी विशेष सूचना देऊन हा तपास गुन्हे शोध पथकाकडे दिला. पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार पोलीस हवालदार समीर चमनशेख, बाळासाहेब चोरामले, रवी देवकाते, स्वप्निल अहिवळे, संतोष साठे यांच्यासमवेत या गुन्ह्याचा व्यवस्थित अभ्यास केला. त्यांना मयताच्या शर्टवर एक टेलरमार्क मिळाला. त्यावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता तो कर्नाटकमधील निघाला. पोलीस पथकाने तेथे जाऊन चौकशी केली असता या टेलरचे दुकान सांगवी, पुणे येथे होते, ते दोन वर्षांपूर्वी बंद केल्याचे त्याने सांगितले. या खूनप्रकरणातील मयत व्यक्ती हा सांगवी परिसरातील असावा, असा अंदाज असल्याने या पोलीस पथकाने मयताचे फोटो व वर्णनाची भित्तीपत्रके या परिसरात चिकटवली. परंतु त्याचे नातेवाईक मुंबई येथे, तर पत्नी सहा महिन्यांपासून माहेरी रहात असल्याने त्यांना या प्रकाराची माहिती नव्हती, म्हणून त्यांनी हरवल्याची तक्रार दिली नव्हती. ही बाब पोलीस मित्र गौरव टन्नू यांनी सांगताच त्याच्याशी संपर्क साधला व ते आल्यानंतर मयताची ओळख पटली. परंतु त्याचा खुनी मात्र मोकाट फिरत होता. गुढीपाडव्याचे दिवशी थेऊर येथे गर्जे हा मद्याच्या धुंदीत मी खून केला असे ओरडत असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो बीड येथे गेला असल्याचे समजले. परंतु तो वाघोली येथे येणार असल्याचे समजल्याने तेथे सापळा रचला त्यात तो अलगद अडकला. (वार्ताहर)