शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मागे खंजीर कुणी खुपसले? पक्क माहीत; तुम्ही 'या' भूमिकेवर या, मराठा डोक्यावर घेऊन नाचेल! जरांगे यांचा सरकारला नवा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 11:55 IST

"मागचे पाढे गिरवत बसण्यापेक्षा, मागे खंजीर कुणी खुपसले आहेत? हे मराठ्यांना पक्क माहीत आहे. १६ टक्के आरक्षण देऊन मराठ्यांचे वाटोळे कुणी केले? हेही मराठ्यांना माहीत आहे."

मागचे पाढे गिरवत बसण्यापेक्षा, मागे खंजीर कुणी खुपसले आहेत? हे मराठ्यांना पक्क माहीत आहे. १६ टक्के आरक्षण देऊन मराठ्यांचे वाटोळे कुणी केले? हेही मराठ्यांना माहीत आहे. पण तुम्हीही त्याच पावलावर पाऊल ठेवून चाललात. नुसते देतात आणि ६ महिन्यांत उडाले. असे म्हणत, "आम्हाला कणखर वागावेलागणार आहे. मराठ्यांना जो न्याय तोच ओबीसींना न्याय. आम्हाला १९९४ ला दिलेल्या किंवा १९६७ नंतर घातलेल्या सर्व जाती उडवाव्या लागणार आहेत. नसता मराठ्यांना न्याय द्यावा लागेल. या भूमिकेवर या, मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल," असा सल्ला मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारासोबत बोलत होते.

जरांगे म्हणाले, "मागचे पाढे गिरवत बसण्यापेक्षा, मागे खंजीर कुणी खुपसले आहेत? हे मराठ्यांना पक्क माहीत आहे. १६ टक्के आरक्षण देऊन मराठ्यांचे वाटोळे कुणी केले? हेही मराठ्यांना माहीत आहे. पण तुम्हीही त्याच पावलावर पाऊल ठेवून चाललात. नुसते देतात आणि ६ महिन्यांत उडाले. लोकांना छाती ठोकूण म्हणताच येईनना की, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला आपलं आरक्षण दिलं, आपलं वाटोळं केलं. पण तुम्ही दिलं ते वर्षभर टिकले अथवा पिढ्यानंपार टिकले, असे मराठ्यांना छाती ठोकून सांगताच येईनना, त्यामुळे दोघेही सारखेच झालेना तुम्ही, एका पारड्यातले."

हैदराबादचं गॅझेट १३ तारखेच्या आत लावा -"आम्हाला असं छाती ठोकून सांगायला माणूसच नाही राहिला की, यांनी आयुष्याचं दिलंय मराठ्यांना. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तर तुम्हाला माझी भाषाच कळत नाहीय. की शिंदे साहेब फडणवीस साहेब तुम्ही आमचं सरकारी नोंदी आहेत हैदराबादचं गॅझेट १३ तारखेच्या आत लावा. सातारा संस्थानचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं लावा," असा सल्लाही मनोज जरांगे यांनी यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिला. 

...आणि तुम्ही छाती ठोकूण सांगाना, सरकारी नोंदी आहेत, ते द्यावे लागणार - "१९६७ च्या कायद्यानुसार ओबीसींना आरक्षण दिले आहे. ओबीसीमध्ये ज्या जाती घातल्या. त्यात ८३ क्रमांकावर मराठा आहे, कुणबी आहे. पोट जात म्हणून मराठ्यांना आरक्षण द्या. बाकिच्यांना तुम्ही दिलं आहे पोटजात म्हणून. असलं आरक्षण द्या आणि तुम्ही छाती ठोकूण सांगाना, सरकारी नोंदी आहेत, ते आम्हाला द्यावे लागणार आहे. जातीवाद होवो अगर न होवो. पण आम्ही सरकार आहोत. आम्ही मराठ्यांवरही अन्याय करणार नाही आणि ओबीसींवरही अन्याय करणार नाही. ज्या सरकारी नोंदी आहेत त्या नोंदी देणार," असे जरांगे म्हणाले.

...तर मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल -"जशा १९६७ ला १८० जाती घेतल्या. त्यानंतर, ३००-४०० पोट जाती म्हणून घेतल्या. तशीच कुणब्याची पोट जात म्हणून मराठा आम्ही घेणार आहोत. नसता आम्हाला कणखर वागावेलागणार आहे. मराठ्यांना जो न्याय तोच ओबीसींना न्याय. आम्हाला १९९४ ला दिलेल्या किंवा १९६७ नंतर घातलेल्या सर्व जाती उडवाव्या लागणार आहेत. नसता मराठ्यांना न्याय द्यावा लागेल. या भूमिकेवर या, मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल," असेही जरांगे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षण