शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला ही आमच्यासाठी दु:खाची गोष्ट; शिंदे गटाची प्रतिक्रिया आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 23:40 IST

शिवसेनेतील १४ आमदार आणि आणि वेगळे नाही, आमचा गट एकच असेल. आता पुढचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असे केसरकर म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, भाजपाने ताज हॉटेलमध्ये आनंद साजरा केला, तरी गोव्यात पोहोचलेल्या शिंदे गटाकडून काहीच प्रतिक्रिया येत नव्हती. परंतू, रात्री उशिरा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागणे ही आमच्यासाठी दु:खाची गोष्ट आहे. आम्ही त्यांना लवकर निर्णय घेण्यासाठी सांगत होतो. परंतू, त्यांनी वेळ लावला, यासाठी काही मोठे नेते जबाबदार आहेत. आमच्यासमोरील पर्याय संपतील असे त्यांना आम्ही सांगितले होते, शेवटी ती वेळ आली, असे दीपक केसरकर म्हणाले. 

आम्ही उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाण्याआधीच भेटलो होतो, सारे काही सांगितले होते. परंतू, आम्हाला काही नेत्यांनी लांब केले. ठाकरेंच्या एनसीपीचे नेते जवळचे झाले, आणि आम्ही लांब होत गेलो. त्याला उद्धव ठाकरे जबाबदार नाहीत. पण आता अंतर वाढले आहे, असेही केसरकर म्हणाले. 

संजय राऊत मधेच असतील तर ठाकरे आणि शिंदे गट एकत्र  येण्याची शक्यता नाहीय. नाहीतर आम्ही ठाकरेंना आमच्यासोबत बोलवू, तेच आमचे नेते आहेत. आम्हाला जर कोणी डुक्कर, कुत्रा म्हणत असेल किंवा आमच्या आई, बहीणींना शिव्या देत असेल तर कसे आम्ही त्यांच्यासोबत राहू, असा सवालही केसरकर यांनी उपस्थित केला. शिवसेनेतील १४ आमदार आणि आणि वेगळे नाही, आमचा गट एकच असेल. आता पुढचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. कदाचित ते नसतील. आमचा व्हीप नाही पाळला तर त्यांना डिसक्वालिफाय करायचा की नाही हे शिंदे साहेब ठरवतील, असा इशाराही केसरकर यांनी दिला. 

संजय राऊत रोज सकाळी ९ वाजता उठून कसली कसली वक्तव्ये करायचे, ज्या मोदींना जगात नावाजले जाते त्यांना काहीबाही बोलायचे, कशासाठी ्असे वितुष्ट आणायचे. यामुळे आम्ही भाजपासून लांब गेलो. राऊत पन्नास टक्के राष्ट्रवादीचे आणि उरलेले शिवसेनेचे आहेत. ते नेहमी राष्ट्रवादीच्या बाजुने असतात. शिवसेना तुटली तरी त्यांना फरक पडत नाही, असा आरोप केसरकर यांनी केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDeepak Kesarkarदीपक केसरकर Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना