शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयांनी डिपॉझिट मागणे गैर नाही; पुणे मनपाच्या आदेशाला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 09:29 IST

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एका गर्भवती महिलेच्या प्रसुतीसाठी दहा लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्यास सांगितले होते. त्यानंतर पुणे महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला, ज्याला आयएमएने विरोध केला आहे.

मुंबई : यापुढे पुण्यातील कोणत्याही रुग्णालयाने अनामत रक्कम मागू नये, असा आदेश पुणे महानगरपालिकेने काढला. मात्र, त्याला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए - महाराष्ट्र)  विरोध केला आहे. अनामत रकमेची मागणी करणे गैर नाही, अशी भूमिका ‘आयएमए’ने घेतली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अनामत रक्कम न दिल्याने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवतीवर उपचार केले नाहीत. त्यामुळे  प्रसूतिपश्चात तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने राज्यात संतापाची लाट उसळली होती.  

डॉक्टरांच्या संघटनेने काढलेल्या पत्रकात असेही म्हटले आहे की, धर्मादाय रुग्णलयांना सरकारदरबारी काही सवलती मिळतात. त्यामुळे त्यांनी अनामत रक्कम मागू नये असे सांगणे एकवेळ मान्य करता येईल; पण अनेक लहान  आणि मध्यम प्रकारची रुग्णालये आणि धर्मादाय रुग्णालये यामध्ये गल्लत करू नये. सर्वांना एकाच पारड्यात तोलू नये.  

डॉक्टरांच्या संघटनेचे म्हणणे काय?

याप्रकरणी आयएमए संघटनेचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम म्हणाले, ‘रुग्ण जर इमर्जन्सीमध्ये आला तर आम्ही प्रथम त्याची प्रकृती स्थिर होण्यावर लक्ष केंद्रित करतो. त्यावेळी आम्ही अनामत रक्कम मागत नाही. अत्यावश्यक सेवा आम्ही देतोच.’

लहान आणि मध्यम रुग्णालये चालविण्यासाठी दीर्घकालीन आणि वारंवार होणारा खर्च लक्षात घेता अनामत रकमेची मागणी अजिबात गैर नाही, असे आमचे मत आहे. त्यामुळे अमानत रकमेची मागणी करूच नये, असे म्हणणे अन्यायकारक आहे. -डॉ. संतोष कदम, अध्यक्ष, आयएमए

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका