शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:53 IST

Sharad Pawar: पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी भाषा अनिवार्य करणं योग्य नाही. मात्र देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे हिंदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रामध्ये शाळेत पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्यावरून सध्या राजकारण तापलं आहे. तसेच राज्य सरकारकडून हिंदी भाषेच्या होत असलेल्या सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची हिंदी भाषेच्या सक्तीबाबतची प्रतिक्रिया समोर आली आहे. पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी भाषा अनिवार्य करणं योग्य नाही. मात्र देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे हिंदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला होत असलेला विरोध आणि हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, या प्रश्नाला दोन बाजू आहेत. पहिली म्हणजे पहिलीपासून चौथीपर्यंत हिंदी भाषा अनिवार्य करणे योग्य नाही. पण पाचवीनंतर आपण हिंदी भाषा अनिवार्य करू शकतो. भारतात ५० टक्के नागरिक हिंदीत बोलतात. त्यामुळे हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले.

तर ठाकरे बंधूंकडून होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याबाबत शरद पवार म्हणाले की, कोणीही सांगतो म्हणून आंदोलनात सहभागी होता येणार नाही. मुंबईत गेल्यावर मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मांडलेली भूमिका ऐकून घेईन. महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय असेल तर भूमिका घेतली जाईल, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्रmarathiमराठीhindiहिंदी