शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भिडेंचे डोकं ठिकाणावर आहे की नाही, हेच कळत नाहीय; मंत्री भुजबळांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 14:37 IST

जगात असा एकही देश नाही, जिथे महात्मा गांधी यांचा पुतळा नाहीय. खरे म्हणजे तो मनोहर भिडे आहे. - छगन भुजबळ

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींवर केलेल्या वक्तव्यावर आता सत्ताधारी पक्षही टीका करू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसने राज्यभरात ठीकठिकाणी आंदोलने केली आहेत. संभाजी भिडेंचा निषेध व्यक्त केला आहे, त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. अशातच आता सत्ताधारी मंत्र्यांकडून यावर प्रतिक्रिया येऊ लागली आहे. 

जगात असा एकही देश नाही, जिथे महात्मा गांधी यांचा पुतळा नाहीय. खरे म्हणजे तो मनोहर भिडे आहे. आंब्याच्या संदर्भात वक्तव्य होते, त्यावर आम्ही कोर्टात गेलो आहे. मोदी किंवा अमित शाह यांच्यापैकी कुणालाही महात्मा गांधींच्या बाबतीतले हे वक्तव्य आवडणारे नाही. भिडेंवर कडक कारवाई व्हावी, या मताचा मी आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली. त्यांच्याबरोबर जाणे म्हणजे आत्मघातकी आहे, असा इशाराही भुजबळ यांनी दिला. 

पंडित नेहरू यांच्या वडिलांनी सगळं देशासाठी दान केले होते. स्वतः नेहरू साडे अकरा वर्षे तुरुंगात होते. त्यावेळी माहित नव्हतं, स्वातंत्र्य मिळेल की नाही. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नाही, तर भलामन करू नका, स्तुती करू नका. आम्ही स्वतः भिडेंच्या विरोधात कोर्टात आहोत. पण कोर्टात तारीख मिळत आहे. भिडेंचे डोके ठिकाणावर आहे की नाही, हेच कळत नाही, अशी कठोर प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे. 

मुंबई नाशिक मार्ग खड्ड्यांवर बोलताना मी स्वतः रेल्वेने येतो, केसरकरांची गाडी अंतर ठेवून रस्त्याच्या वरुन चालत असेल. आम्ही सगळे आमदार वेडे आहोत का? तुम्ही दुरुस्त करा, पण खड्डे नाही असं म्हणू नका, आम्ही सगळे आमदार ट्रेनने आलो आहोत. मुंबई महापालिका कोल्ड मिक्सवगैरे वापरते, ते वापरून सुधारणा करा, असे प्रत्यूत्तर भुजबळ यांनी आपल्याच सरकारला दिले.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी