शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

हिंदू असल्याचे वाईट वाटते

By admin | Updated: January 12, 2017 03:06 IST

माझं काही चुकत आहे, तर मी माफी मागते, ही परिस्थिती आता राहिलेलीच नाही. त्या माणसालाही काही मत असू शकते

नम्रता फडणीस / पुणेलेखिका, स्त्रीवादी चळवळीच्या पुरस्कर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या, अशा विविधांगी भूमिकेतून विद्या बाळ यांनी समाजातील विषयांना वाचा फोडली. परिवर्तनवादी विचारांची कास धरली, त्यांची लढाई ही पुरुषविरोधी नव्हती, तर स्त्रियांना हव्या असलेल्या समान हक्कांची होती. वयाच्या ८१व्या वर्षात उद्या (दि. १२) त्या पदार्पण करीत आहेत. मात्र, आजही स्त्रियांच्या प्रश्नांशी तितक्याच ताकदीने भिडण्याची त्यांच्यातील धग कायम आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद... माझं काही चुकत आहे, तर मी माफी मागते, ही परिस्थिती आता राहिलेलीच नाही. त्या माणसालाही काही मत असू शकते, ते ऐकून न घेता सरळ भांडण, मारामारी, खून या गोष्टींपर्यंत मजल जाते. यातून काय मिळणार आहे, हेच कळत नाही. शांतपणे दुसऱ्याचे ऐकून घेणे, त्याला विचारांनी प्रतिवाद करणे या गोष्टी व्हायला पाहिजेत, पण ते होताना दिसत नाही. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ कुठे चालला आहे? विचार हे धर्माच्या पलीकडचेच असले पाहिजेत. शाहू, फुले-आंबेडकर यांचे नाव घेऊन स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारायच्या आणि जगण्या-बोलण्यात फरक दाखवायचा. सत्ताधाऱ्यांना मुस्लिमांचे प्रमाण वाढल्यासारखे वाटते, मात्र मुस्लिमांचे प्रमाण हे १५ ते १८ टक्के इतकेच आहे. न्यूनगंड कसला आहे? जो भारतात राहतो तो भारतीय आहे. धर्मनिरपेक्षतेची खूण त्यांच्या मनातच नाही. हिंदुत्वाचा अहंकार करण्याची गरजच काय? धर्म हा आपल्या घरात पाळावा. मात्र धर्म आणि देश एकाच जागी ठेवून गोंधळ घातला आहे. त्यामुळे मला हिंदू असल्याचे वाईट वाटते, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी सांगितले.* महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हटले जाते? मात्र सत्ताधाऱ्यांच्या लादल्या जाणाऱ्या विशिष्ट गोष्टींमुळे पुन्हा धार्मिक उन्मादाकडे प्रवास सुरू झाला आहे, असे वाटते का?- जुन्या काळात जे आदर्श होते असे वाटते तेच पुन्हा लादण्याचा प्रयत्न होतो आहे हे नक्की. १८४८ मध्ये महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली आणि जगाची कवाडे महिलांना खुली करून दिली. मात्र, आपण काळाच्या मागे चाललो आहोत, मुलींनी असेच कपडे घालायचे नाहीत, इतकीच मुले जन्माला घाला. धार्मिक कार्यक्रमांना पुरोगामी राज्याचा मुख्यमंत्री जातो यातच सगळे आले. * ‘स्त्री’ मासिक ते ‘मिळून साऱ्या जणी’ या मासिकांचा प्रवास कसा होता? पत्रकारितेत बदल झाले आहेत असे वाटते का?- स्त्री मासिकात १९६४ ते १९८६ अशी २२ वर्षे सहायक संपादक, मुख्य संपादक म्हणून काम केले. स्त्री मासिकामुळे जीवनदृष्टी बदलली. विचारांच्या कक्षा रुंदावल्या आणि मिळून साऱ्या जणीचा पाया तयार होत गेला. तिथून राजीनामा दिल्यानंतर १९८९ मध्ये ‘मिळून साऱ्या जणी’ हे मासिक सुरू केले. ४० वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता केली. आजच्या परिस्थितीचा विचार केला तर झपाट्याने बदल झाले असल्याचे नक्कीच जाणवते. त्या काळात लेखक आणि संपादकाचे नाते खूप मोकळेपणाचे होते. ते वातावरण आज तुलनेने कमी झाल्यासारखे वाटते. पत्रकारितेत नवीन तंत्रज्ञानामुळे दोघांमधील अंतर वाढत गेले आहे. * पत्रकारितेत अधिक काळ घालविल्यानंतर काय भावना मनात येते?- पत्रकारितेशी बांधिलकी राखली तर विचारांचे वाहक होऊ शकतो, प्रबोधनाची एक लाट निर्माण होऊ शकते. स्त्री मासिक वाचणारी जुने लोक भेटतात आणि म्हणतात तुमच्या कामाने आणि मासिकाने आम्हाला आधार दिला, तेव्हा याच्यासारखा दुसरा पुरस्कार नाही, अशी भावना होते, हे समाधानच खूप मोठे आहे.