शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

कोरेगाव-भीमातील दंगलग्रस्तावर ‘इस्लामी हिंद’ घालणार फुंकर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 20:12 IST

कोरेगाव-भीमा दंगलीनंतर समाजात निर्माण झालेल्या सामाजिक तेढीवर फुंकर घालण्यासाठी जमाअत-ए- इस्लामी हिंद या संघटनेने पुढाकार घेतला आहे.

मुंबई : कोरेगाव-भीमा दंगलीनंतर समाजात निर्माण झालेल्या सामाजिक तेढीवर फुंकर घालण्यासाठी जमाअत-ए- इस्लामी हिंद या संघटनेने पुढाकार घेतला आहे. राज्यात पूर्ववत एकात्मता व बंधुतेचे वातावरण कायम राहून जातीय व धार्मिक द्वेष दूर व्हावा, यासाठी येत्या शुक्रवार (दि. १२) राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येणार आहे.पुण्यातील कोरेगाव-भीमा या ठिकाणासह राज्यभरातील ६०० ठिकाणी विविध माध्यमातून सामाजिक समता व बंधुतेचा प्रसार करण्यात येणार आहे. २१ जानेवारीपर्यंत चालणा-या या मोहिमेमध्ये ५० लाख नागरिकांशी संवाद साधण्यात येईल, असा दावा संघटनेचे सचिव अस्लम गाझी व डॉ. सलीम खान यांनी दिली. या मोहिमेमध्ये मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बामसेफसह अनेक सामाजिक व स्वयंसेवी संघटना सहभागी होणार आहेत. त्यांच्या सहकार्याने शाळा, महाविद्यालये, बस स्थानके आदी ठिकाणी धार्मिक, जातीय एकात्मतापर व्याख्यान, रॅली, भीती पत्रकांचे वाटप केले जाईल. व्हॉटस्अॅप, फेसबुक, ट्विटर आदी सोशल माध्यमाचाही वापर केला जाणार असून, त्यासाठी स्वतंत्र वेबसाईट बनविण्यात आल्याचे शकीर अहमद व मुजीब आदील, शेख हुमायून यांनी सांगितले.इस्लाम हा शांती, सामाजिक विकास व बंधुतेची शिकवण देणारा धर्म असून, त्याचे पूर्णपणे आचरण केल्यास समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरेला आळा बसेल, त्याच्या प्रसारासाठी जमाअत-ए-इस्लामी हिंद कार्यरत असते. दरवर्षी पंधरवडाभर विशेष मोहीम राबविली जात आहे. या वर्षी कोपरगाव-भीमा येथे घडलेल्या दंगलीमुळे सामाजिक तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या तीन वर्षांपासून जातीय शक्ती व संघटनांच्या हालचाली वाढत असून धार्मिक व सामाजिक एकात्मता आणि विकास रोडावत चालला असताना या दंगलीमुळे त्यामध्ये आणखी भर पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविली जाणार आहे. विविध मान्यवर, तज्ज्ञ सहभागी होती. कोपरगाव येथे जाऊन दलित व मराठा समाजासमवेत चर्चा करून पूर्ववत एकोपा कायम राखण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे गाझी यांनी सांगितले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव