शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटकांसह परभणीमध्ये पकडला इसिसचा हस्तक

By admin | Updated: July 25, 2016 05:36 IST

इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या मोहंमद शाहीद मोहंमद कादर अली खान (२४) या हस्तकाला दहशतवादविरोधी पथकाने परभणीतून स्फोटकांसह अटक केल्याने खळबळ उडाली आहे

एटीएसची दुसरी मोठी कारवाई; २ बॉम्ब जप्तऔरंगाबाद/परभणी : इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या मोहंमद शाहीद मोहंमद कादर अली खान (२४) या हस्तकाला दहशतवादविरोधी पथकाने परभणीतून स्फोटकांसह अटक केल्याने खळबळ उडाली आहे. परभणीतून झालेली ही दुसरी अटक असल्याने ‘इसिस’ने मराठवाड्यात खोलवर शिरकाव केल्याच्या संशयाला पुष्टी मिळाली आहे. मराठवाड्यातील सुमारे शंभर तरुण बेपत्ता असून, ते इसिसच्या संपर्कात असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्या दृष्टीने आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली. दहा दिवसांपूर्वी परभणीतूनच इसिसशी संबंधित नासेरबिन अबूबकर याफई चाऊस याला एटीएसने अटक केली होती. नासेरबिन याने बॉम्ब बनवून त्याचे फोटो सीरियातील इसिसच्या हस्तकाला पाठविले होते. एक किलो आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव डिव्हाइस) आणि दोन बॉम्ब शाहीदकडेच असल्याची माहिती नासेरकडून मिळाल्यानंतर औरंगाबाद एटीएसच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री शाहीदला परभणी येथील कादराबाद प्लॉट परिसरातून अटक केली. नासेरबीन आणि शाहीद हे सीरियातील फारूख या दहशतवाद्याशी इंटरनेटद्वारे संपर्कात होते. शाहीदकडे सापडलेल्या स्फोटकाचा नमुना फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आला आहे. (प्रतिनिधी)शाहीदला २९ जुलैपर्यंत एटीएस कोठडीएटीएसने कडक बंदोबस्तात शाहीदला रविवारी दुपारी औरंगाबादेतील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. एल. पठाण यांच्यासमोर हजर केले. न्यायालयाने त्यास २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या संशयित अतिरेक्यास एटीएसने उचलल्याची माहिती मिळाल्यापासून, प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी कोर्टात गर्दी केली होती. त्या वेळी इन-कॅमेरा सुनावणी झाली. नासेरबीन आणि शाहीद यांनी सीरियातील फारूख या दहशतवाद्याकडून बॉम्ब तयार करण्याचे साहित्य व तंत्र याची आॅनलाइन माहिती मिळवली. त्यानुसार त्यांनी डिटोनेटर्स, आरडीएक्स, आयईडी आणि अन्य साहित्य जमा केले होते. औरंगाबाद, नागपूर आणि हैदराबाद या शहरांत ईददरम्यान बॉम्बस्फोट घडविण्याचा कट त्यांनी रचला होता. मात्र, ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्याने या दोघांना कोणत्याही हालचाली करता आल्या नसल्याचे सूत्रांकडून समजले.पालकांनो, मुलांवर लक्ष ठेवा!गेल्या दोन वर्षांत विमानतळावरून १०० पेक्षा अधिक तरुणांना परत आणून त्यांचे मतपरिवर्तन करण्यात आले आहे. त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल न करता समज देण्यात आली आहे. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. तो चुकीच्या मार्गावर जाऊ नये, यासाठी काळजी घेतली पाहिजे. इंटरनेटचा वापर जबाबदारीने आणि योग्य पद्धतीने करावा. - अतुलचंद्र कुलकर्णी(एटीएस, प्रमुख)आजीच्या घरी दडविली स्फोटके शाहीद खान याने परभणीतच आजीच्या घरी दडवून ठेवलेल्या आयईडीसह डिटोनेटर्सचा साठा एटीएसने जप्त केला. ही स्फोटके त्याने पाण्याच्या बाटल्यांच्या बॉक्समध्ये दडवून ठेवले होते, असे सूत्राने सांगितले.100तरुण इसिसच्या संपर्कात?मराठवाड्यातील १०० तरुण बेपत्ता असून, ते इसिसच्या संपर्कात असावेत. त्यामुळे त्यांचा शोध घेऊन कसून चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेचे परभणी येथील आमदार राहुल पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत शून्यप्रहरात केली होती. मराठवाड्यातील युवक चुकीच्या मार्गाने जात असून, बेपत्ता युवकांचा शोध सुरू आहे. एका तरुणाच्या लॅपटॉपमध्ये तीन हजारांपेक्षा अधिक छायाचित्रे सापडली असून, त्या प्रत्येक छायाचित्राचा अर्थ काय, याचा शोध एटीएसकडून सुरू आहे, असे एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी लातूर येथे सांगितले.